सामुदायिक विवाहात 89 आदिवासी जोडपे

सामुदायिक विवाहात 89 आदिवासी जोडपे

वांगणसुळे / पळसन । वार्ताहर | Vangansule / Palsan

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) पळसण (palsan) येथे डीवायएफआय (DYFI) व सीपीआयएम (CPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 89 गरीब गरजू आदिवासी नव वधू - वरांचा (Tribal bride and groom) आदिवासी परंपरागत सामुदायिक लग्न सोहळा (Tribal traditional community wedding ceremony) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

लग्न सोहळा (wedding ceremony) आदिवासी चाली रिती, आदिवासी परंपरा, वंश, निसर्ग पुजा, धान्य पुजा, बोली भाषा इत्यादी ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला. सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवन येथे माकपाच्या नेतृत्वाखाली एप्रिल 1980 साली महाराष्ट्रात (mahrashtra) सर्व प्रथम 28 आदिवासी नव वधू- वरांचा आदिवासी पद्धतीने सामुदायिक लग्न सोहळा कविवर्य कुसुमाग्रज जेष्ठ किसान नेते नाना मालुसरे, प्रभाकर संझगिरी, के. के. पवार, रामजी धुळे, कुष्णा धुम, मुरलीधर बागुल, हरीभाऊ महाले, गुणाजी गावीत, माजी आमदार जे. पी. गावीत, रामभाऊ महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला होता.

तेव्हा पासुन ते आज पर्यंत सुरगाणा (surgana), पेठ (peth), हरसुल (harsul), कळवण (kalwan) या आदिवासी तालुक्यात किसान सभा (kisan sabha), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) व आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण (Adarsh ​​Samata Shikshan Prasarak Mandal Alangun) यांच्या मार्फत अविरतपणे गरीब मुला - मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सुरुच आहे.

मे 1980 ते आज दि.24 मे 2022 पर्यंत माकपा व किसान सभेच्या वतीने साधारण 10 हजार तरुण गरीब मुला - मुलींचे लगीन मोफत लावून देत त्यांच्या नविन सुखी परिवाराची सुंदर सुरुवात करुन दिली आहे. तालुक्यात राक्षसभुवन, अलंगुण, हातरुंडी, पळसण, हस्ते, सुरगाणा, तोरणडोंगरी, रगतविहिर, निंबारपाडा, सुभाषनगर, हतगड, करंजुल आदी ठिकाणी सामुदायिक लगीन सोहळे यापूर्वी आयोजित केले होते.

त्याच धर्तीवर आजचा पळसण येथील सामुदायिक लगीन सोहळा आयोजित करण्यात आला. लग्नात होणार्‍या अवास्तव खर्चाला कात्री लावून तो पैसा सुखी संसाराला लागला पाहिजे व आपली आदिवासी परंपरा पुढे सुरुच ठेवली पाहिजे. विशेष म्हणजे माकपने सुरुवात केलेल्या या अभिनव उपक्रमाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली होती. मे 2005 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब हे स्वत: अलंगुण येथील 501 सामुदायिक लगीन सोहळ्यासाठी खास दाखल होऊन सामुहिक लग्नातील वधू वरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

तेव्हाच देशमुख यांनी जाहीर केले होते की, आदिवासी बांधवांच्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी येथुन पुढे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत प्रत्येक जोडीला 10 हजारांचे अनुदान दिले जाईल. ते 10 हजाराचे अनुदान देण्यास तेव्हा पासून सुरुवात झाली. सुरगाणा तालुक्यात माकपने सुरु केलेल्या सामुदायिक लग्न सोहळ्याचा आदर्श घेऊन आज अनेक लोकांनी त्यांचे स्वत: चे व त्यांच्या मुला बाळांचे लगीन सामुदायिक सोहळ्यात पार पडली आहेत. त्यामध्ये किसान सभेचे नेते सावळीराम पवार यांचे स्वत:चे लग्न सामुदायिक मध्ये झाले. माजी आमदर जे. पी. गावीत यांच्या तीन मुलांचे लग्न सामुहिक पध्दतीने संपन्न झाले. बार्‍हे येथील उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, पळसण येथील सरपंच केशव गवळी, अशा अनेक कार्यकर्त्यांची लग्न सामुहिक पध्दतीने संपन्न झाली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून करोना देशात कडक लॉकडॉऊन असल्याने अनेकांची ठरलेली लग्ने रखडली होती. त्या लग्नांना यावर्षी मुहूर्त मिळाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात लग्नांची रेल चेल होती. त्यातच पळसण येथे माकपचे तालुका सेक्रेटरी सुभाष चौधरी यांच्या प्रमुख आयोजनाने व जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली तसेच आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण आणि आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य, गु्रप ग्रामपंचायत पळसण यांच्या सहकार्याने 79 जोडप्यांचा सामुदायिक लगीन सोहळा आयोजित करण्याची संधी मिळाली.

आजच्या सामुहिक लग्न सोहळ्यात माकपाचे राज्य सेक्रेटरी उदय नारकर, राज्यध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, जिल्हा अध्यक्ष सावळीराम पवार, माकपा जिल्हा भिका राठोड, सिताराम ठोंबरे, धर्मा शिंदे, इंद्रजीत गावीत, उत्तम कडु, विजय घांगळे, धर्मेंद्र पगारीया, वसंतराव बागुल, चिंतामण गवळी, अशोकराव धुम, कील पठाण, सुरेशभाऊ गवळी, भरत शिंदे सरकार,

डॉ. महाजन, पाडवी, भरत पवार, चिंतामण टेलर, मनोहर सचिव, रोहिदास वायरमन, डॉ. दिनेश चौधर, डॉ. झाडगे, नितीन गावीत, पांडुरंग गायकवाड, चंद्रकांत वाघेरे, मोहन जोपळे, कृष्णा भोये, युवराज, कैलास पवार, मोहनराव पवार, योगिराज महाले, अनिता देशमुख, लक्ष्मी चौधरी, कल्पना भोये, भारती चौधरी, अरुणा गावीत, लिलाधर चौधरी, हेमंतकुमार चौधरी, केशव गवळी, राहुल गावीत, सुरेश पवार, रावण चौरे साहेब, कवी रमेश भोये, ठाकरे, जयराम गावीत, संजय गवळी, मंगलदास गुरुजी, जिवला गुरुजी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com