पिंमकोच्या 19 जागांसाठी 88 अर्ज

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

जिल्ह्यात 6500 सभासद असलेल्या येथील पिंपळगाव मर्चंट बँक संचालक मंडळ (Board of Directors of Pimpalgaon Merchant Bank) पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 19 जागांसाठी 88 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे आता 28 जुलै रोजी अर्ज माघारीच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) व परिसरात खेडगाव (khedgaon), वडनेर (vadner), सुकेणे (sukene) आणि नाशिक (nashik) येथे शाखा असलेल्या पिंपळगाव मर्चंट बँकेच्या माध्यमातून लहान-मोठे व्यवसायिक, उद्योजक, व्यापारी यांच्या आयुष्याला गती मिळाली आहे. एकीकडे सहकार क्षेत्र कोलमडत असताना पिमकोच्या जडणघडणीत अशोक शाह यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने मोठी प्रगती साधली आहे. त्यामुळे आजही बँकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

यापूर्वी देखील प्रत्येक निवडणुकीत (election) अशोक शहा यांच्या नेतृत्वाखाली पॅनल या बँकेत निवडून आले आहे. त्यामुळे 28 जुलैला उमेद्वारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निवडणूक बिनविरोध न झाल्यास दि.6 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया होऊन 7 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून सह निबंधक रणजीत पाटील काम पाहत आहेत.

शाह गटाचे तीन उमेद्वार बिनविरोध

उमेद्वारी अर्ज दाखल झाल्यानंतर अशोक शाह यांच्या गटाचे तीन उमेद्वार बिनविरोध निवडून आले आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती (Nomadic destitute castes and tribes) गटात विद्यमान संचालक व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गोसावी यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने व दोन महिला राखीव जागांसाठी विद्यमान संचालिका सुनंदा उमेश जैन व विद्या घोडके यांचेच अर्ज दाखल झाल्याने या तीनही जागा बिनविरोध निवडल्या आहेत. साहजिकच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

बिनविरोध निवडीचे वेध

पिंपळगाव मर्चंट बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक सर्वसामन्य सभासदांना निवडणुकीत फारसे स्वारस्य दिसत नाही. आपली पिंपळगाव मर्चंट बँक ही नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रणी बँक असा लौकिक आहेत. तिच्या लौकिकाचा विचार होऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे सर्वसामान्य सभासदांना वाटते. अशोक शहा यांच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास ठेवून उर्वरित 16 जागांवरील उमेद्वार समोपचाराने बिनविरोध निवडून द्यावे असा काहीसा सूर बँक सभासद व शहरातील जनमाणसातील चर्चेतून दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com