अमावस्येला 871 वाहनांमधील कांदा लिलाव

लासलगाव बाजार समितीतील 75 वर्षांची परंपरा खंडित
अमावस्येला 871 वाहनांमधील कांदा लिलाव

लासलगाव। वार्ताहर

लासलगाव बाजार समितीत गेल्या 75 वर्षाच्या कालखंडापासून अमावस्येला बंद असलेली कांदा लिलाव प्रक्रिया आज खंडित होवून प्रथमच गुरुवार दि.10 रोजी अमावस्येच्या दिवशी बाजार समिती आवारात कांदा लिलाव सुरू ठेवण्यात आले. यावेळी 871 वाहनातून आलेल्या 16,833 क्विंटल कांद्याची विक्री करण्यात आली असून व्यापारी वर्गाने कमीत कमी 752 रु., जास्तीत जास्त 2,300 रु. प्रति क्विंटल भावाने कांदा खरेदी केला. यावेळी कांद्याला सरासरी 1,801 रु. भाव मिळाल्याचे बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप यांनी म्हटले आहे.

लासलगाव बाजार समितीची स्थापना 1 एप्रिल 1947 रोजी झाली. स्थापनेपासुन 75 वर्षाच्या कालखंडात लासलगाव बाजार समितीत अमावस्येला कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे.

परंतु शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व परीसरातील शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगाव बाजार समितीने अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत काल गुरूवार 10 जुन च्या अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात कांदा पिकाचे लिलाव सुरू केले आहे.

यापुढे प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू राहणार असून शेतकर्‍यांनीं कांदा प्रतवारी करून विक्रीस आणावा असे आवाहन जगताप यांनी केले आहे. गुरुवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी कांदा लिलावास सुरूवात होण्यापूर्वी येथील आराध्यदैवत भगरीबाबा यांच्या प्रतिमेचे व वैजापूर येथील प्रथम शेतकरी ज्ञानेश्वर हिराचंद गायकवाड यांच्या प्रथम आलेल्या कांदा शेतमाल वाहनाचे विधीवत पूजन बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा व्यापारी प्रवीण कदम, दत्तात्रय खाडे व शेतकरी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रथम शेतकरी ज्ञानेश्वर गायकवाड यांचा बाजार समिती संचालक रमेश पालवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुहूर्ताचे पहिले वाहन भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्या., लासलगाव (वेफको) या संस्थेने 2,251 रु. प्रती क्विंटल दराने नाफेड करीता कांदा खरेदी केले. याप्रसंगी कांदा व्यापारी ओमप्रकाश राका, मनोज जैन, अफजल शेख, बाळासाहेब दराडे, प्रफुल्ल भंडारी, राजमल मुणोत, ओम चोथाणी, संतोष माठा, लक्ष्मण जगताप,

अमर ब्रम्हेचा, मोतीलाल माठा, राहूल बरडीया, सुरेश खुर्दे, संदीप गोमासे, सौरभ जैन, अनिल बांगर, रोशन माठा, तुषार देवरे, अरूण गिते, मनिष सारस्वत, शंकर काळे, भास्कर डोखळे, नाना कोकणे, बाजार समिती सहसचिव प्रकाश कुमावत, कांदा लिलाव प्रमुख सुनिल डचके, दत्तात्रय होळकर, हिरालाल सोनारे, काकासाहेब जगताप,

संदीप निकम, मनोज शेजवळ, गौरव निकम, गोरख विसे, ज्ञानेश्वर जगताप, रामदास गायकवाड, गणेश आहेर, सचिन बैरागी, दिनेश सुर्यवंशी, अरूण ठाकरे, कांतीलाल डोमाडे, चांगदेव देवढे, कांतीलाल आंधळे आदींसह शेतकरी, व्यापारी मदतनीस व कामगार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com