दिंडोरी तालुक्यात ग्रामचायतींच्या निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान

आता लक्ष निकालाकडे
दिंडोरी तालुक्यात ग्रामचायतींच्या निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी 87.23 टक्के मतदान पार पडले असुन यानिमित्ताने गाव गाडयाचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.कोणत्याहीठिकाणी निवडणुक निमित्ताने कोणताही गैरप्रकार घडला नाही.

दिंडोरी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 87.23 टक्के मतदान झाले. अगदी सकाळी मतदानाचा जोर केवळ 8 ते 10 टक्के होता. दुपारी तो 38 टक्यांवर पोहचला. दुपारी 2 वाजेनंतर मात्र मतदार घराबाहेर पडले.

बाडगीचापाडा 92 टक्के

ननाशी। दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले असून एकूण 92% मतदान झाले आहे. या ग्रामपंचायतसाठी एकूण तीन बूथवर मतदान घेण्यात आले त्यापैकी बूथ क्र.1 वर एकूण 306 मतदरांपैकी 288 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बूथ क्र.2 वर 351 पैकी 316 मतदारांनी मतदान केले .तसेच बूथ क्र.3 वरील 308पैकी 284 मतदारांनी मतदानाचाहक्क बजावला. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद देऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले. दिवसभर संपूर्ण निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पाडण्यात आली.

लखमापूर 86. 46 टक्के

लखमापूर। लखमापूर ता.दिंडोरी येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत 86.46 टक्के मतदान झाले आहे. येथे 10 जागेसाठी 21 उमेदवार रिंगणात असून कार्यकर्त्यांची मतदार आणण्यासाठी मोठी धावपळ दिसत होती. प्रत्येक उमेदवाराने स्वतःचे पोलिंग बूथ वर मतदारांसाठी मास्क ची व्यवस्था केली होती.

आंबेदिंडोरी 87.18 टक्के

आंबेदिंडोरी । आंबेदिंडोरी येथील ग्रामविकास पॅनल व समर्थ पॅनल या दोन पॅनल मध्ये तर तीन अपक्ष उमेदवार यांच्या मध्ये कुठेहि गालबोट नलागता चुरशीची लढत होवून एकुण मतदान 1959 पैकी 1704 झालेले मतदान आजवरचे हे ऐतिहासिक मतदान ठरले आहे. एकुण मतदान 89.33 टक्के झाले आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये एकुण मतदान 709 पैकी 587 झालेले मतदान 87.79 टक्के, प्रभाग क्र. 2 मध्ये एकुण मतदान 547 पैकी 489 झालेले मतदान 89.43 टक्के. प्रभाग क्र. 3 मध्ये एकुण मतदान 703 पैकी 628 झालेले मतदान 87.18 टक्के मतदान झाले आहे.

वलखेड 87.18 टक्के

वलखेड। वलखेड येथील ग्रामविकास पॅनल व ग्राम समृद्धी पॅनल मध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकी पार पडली. कुठलीही गालबोट न लागता अतिशय चुरशीची लढत होऊन एकूण 1295 मतदानापैकी 1179 मतदान होऊन 91.11% टक्के मतदान झाले.

पालखेड 91.77 टक्के

पालखेड बंधारा । दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. सकाळपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालेल्या या मतदानमध्ये एकूण 2796 मतदानापैकी 2566 मतदान होऊन 91.77 टक्के मतदान झाले. दिंडोरी तालुक्यातील 60 ग्रामपंचतायतीपैकी 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरीत 53 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असून मतदारांनी या मतदानाच्या वेळी उत्साह दाखवून मतदानाला प्रतिसाद दिला. आता सर्व उमेद्वारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com