नाशिक । Nashik

करोना संसर्गाचा झालेला स्फोट बघता रुग्णालयाच्या बेड क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. ४ हजार ५०० बेड संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केला जात असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (दि.५) आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मागील गुरुवारी आढावा बैठकीत भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस व आरोग्य यंत्रणेला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सर्व सेटअप उभारावा असे आदेश दिले होते. सोमवारी बैठकीत आढावा घेऊन प्रशासनाच्या तयारिची भुजबळांनी माहिति दिली.

महापालिका रुग्णालयात २ हजार, जिल्हा रुग्णालयात १ हजार ५०, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात १ हजार ४०० असे साडेचार हजार बेड तयार करण्यात आले आहे.

मविप्रचे डाॅ.वसंतराव पवार व एसएमबिटि रुग्णालयातही बेड संख्या वाढविण्यात आली आहे. दिवसाला तीन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. तर दिवसाला दोन ते अडीच हजार रुग्ण करोना मुक्त होत आहे. ते बघता बेडची संख्या वाढवली जात आहे. ग्रामीण भागात कोव्हिड सेंटर सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचे अधिग्रहण केले जात आहे.

आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

दिवसाला ६५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्यस्थितीत दिवसाला ८५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन तयार केला जात आहे. ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकिसाठी वाहनांची कमतरता असून इतर राज्यातील वाहतूकदारांशी संपर्क सुरु आहे. तसेच ऑक्सिजनचा काळा बाजार होऊ नये यासाठि खबरदारि घेतली जात आहे.

ठरलेल्या दरानेच ऑक्सिजन

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे दर जादा लावले जात असल्याचे समोर येत असुन त्यावर महापालिकेने लक्ष ठेवून कारवाई करावी.

तसेच ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यानूसारच ऑक्सिजनचे दर आकारावे अशा स्पष्ट सूचना भुजबळांनी दिल्या.