येवला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान

येवला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान

येवला । प्रतिनिधी Yevla

ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपूनही करोनाच्या सावटामुळे पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र आता किरकोळ कुरबुरी वगळता ६१ ग्रामपंचायतीसाठी ८४.३३ टक्के मतदान झाले.

गेल्या सात - आठ महिन्यांपासून गाव पुढारी या निवडणूक कार्यक्रमाची वाट पहात होते. गेल्या १५ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता. तेव्हा पासून तालुक्यातील ६९ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होती, ती आज शांत झाली.

आज सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळ पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवार व समर्थकांचे शर्तीचे प्रयत्न कामाला आल्याने तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी ८४.३३ टक्के मतदान झाले. जोरदार टस्सर असलेल्या अनेक ग्रामपंचायतीत मतदानाचा टक्का नव्वदी पार करून गेला आहे.

आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुरमी येथे २८, टक्के पन्हाळसाठे येथे १८ टक्के, देवठाण येथे २२ तर सर्वात कमी ३ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर हा टक्का वाढत गेला साडेतीन वाजेपर्यंत आडगाव रेपाळ येथे ८८, विसापूरला ८१,बाभुळगाव येथे ८०, वाघाळे येथे ८७,कोटमगाव,सातारे येथे ८३,पूरणगाव येथे ८६,मुरमी येथे सर्वाधिक ९४,अंगणगाव येथे ८०, विखरणी ८४,नगरसुल ६६,

पाटोदा ५८.६८राजापूर ७३.४५,मुखेड ६३.६७,पिंपळखुटे बुद्रुक येथे ८८, ठाणगाव येथे ८५ टक्के मतदान झाले होते.तालुक्यात ३९ हजार महिला तर ४३ हजार १६१ पुरुषानी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावत ७२ टक्के मतदान केले.सायगावला मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकणी गर्दी वाढल्याने मतदान वाढत गेले.

सायंकाळी साडेपाच वाजेअखेर तालुक्यात एरंडगावला ९३.७५, विखरणीत ९१.४०,रहाडीत ८९.८०,पाटोद्यात ७०,मुखेडला ७७,देशमाने ७९.२३,देवळाने येथे एकूण ९०, अंगुलगाव ८१,भुलेगाव ८७, बल्हेगाव ८४,बोकटे ८६,आहेरवाडी ८७,रेंडाळे ९२,पिंपळखुटे बुद्रुक ८९,पन्हाळसाठे ८८.४५,निमगाव मढ ९१.५०,गणेशपुर ९१,अंगणगाव ९०.४२,आडगाव रेपाळ ९३.१५,सताळी ८७.३५,आंबेगाव ८९.७, कोटमगाव बु ८७.३७,अंदरसुल ७८.७०,

जळगाव निवड ७९.५०,मुरमी येथे सर्वाधिक ९५.६६,पिंपळगाव लेप ९०.६८,ठाणगाव ९०.४०,धामणगाव ८६.९२,सायगावलया ८२.३४,भाटगाव ९४.१०,रहाडी ८९.८१,राजापूर ७९.४३,पाटोदा ८४.५०,मुखेड ७७ टक्के मतदान झाले.

तालुक्याती एकूण मतदार एक लाख १२ हजार १९९ होते. त्यापैकी ४३ हजार ५३० महिला तर ५१ हजार ९३ पुरुषांनी असे ९४ हजार ६२३ जणांनी(८४.३३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी दिली.

कोळम येथे ऑक्सिजन लावलेली महिलेला मतदानासाठी वाहनातून आणण्यात आले. तर अनेक ठिकाणी जेष्ठाना खांद्यावर उचलून मतदानासाठी आणण्यात आले. विशेषतः यावेळी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिकसह इतर राज्यातील नोकरदार तसेच रोजगारासाठी स्थलांतरीत मतदार मतदानासाठी आल्याने मतदानाचा टक्का वाढला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com