
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी नगरपंचायत (dindori nagar panchayat) दोन जागेसाठी निवडणूक (election) अतिशय शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया (Voting process) पार पडली. दोन जागांसाठी 83. 56 % टक्के मतदान (voting) झाले आहे. एकूण 1667 मतदारांपैकी 1393 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्रभाग क्र. 11 मध्ये एकुण 672 पैकी 587 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर प्रभाग क्र. 16 मध्ये एकुण 995 पैकी 806 मतदारांनी मतदानाचा हक्क (Right to vote) बजावला. दोेन प्रभाग मिळून 1667 मतदारांपैकी 1393 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दिंडोरीत एकुण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात प्रभाग 17 ची जागा बिनविरोध पार पडल्याने उर्वरीत 16 जागेसाठी मतदान प्रक्रिया (Voting process) पार पडली.
त्याचा निकाल (result) आज सकाळी 10 वाजेपासून निकालास सुरुवात होत आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदारांना लागली असून उमेद्वारांची मात्र निकालाची वेळ जवळ येताना बघुन हद्याची धडधड वाढली आहे. निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी (Returning Officer Nilesh Sringi), सहाययक निवडणूक अधिकारी नागेश येवले (Assistant Returning Officer Nagesh Yeolale) आदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (Police Inspector Pramod Wagh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र (Police Constable Rajendra Lahare) लहारे यांच्यासह दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आज मतमोजणी दिंडोरी नगरपंचायतीसाठी 16 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 10 वाजेपासून आदिवासी सांस्कृतिक भवनामध्ये होणार आहे. दोन टप्प्यात मतमोजणी होणार असून पहिल्या टप्प्यात 1 ते 8 प्रभाग तर दुसर्या टप्प्यात 9 ते 16 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकुण 8 टेंबलवर ही मतमोजणी होणार आहे. साधारणत: 12 वाजेपर्यंत पुर्ण मतमोजणीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सवार्र्परी तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रात मतमोजणीच्या वेळी फक्त उमेद्वारालाच किंवा उमेदवारांने नेमणूक दिलेल्या प्रतिनिधींनीनाच प्रवेश असून लसीकरणाचे एक किंवा दोन लस घेतलेले आहे की नाही ते बघुन प्रवेश दिला जाणार आहे.
निलेश श्रींगी, निवडणूक निर्णय अधिकारी, दिंडोरी
.... तर कार्यवाही होणार सध्या करोनाने दिंडोरी तालुक्यातही शिरकाव केला असून जिल्ह्यात दोन नंबरला दिंडोरी तालुका दिसतो. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्यापेक्षा घरी राहुनच निकाल ऐकावा. यासाठी उमेद्वारांनीही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच विजयी मिरवणूकांना राज्यात बंदी असल्याने दिंडोरीतही विजय मिरवणूकांसाठी बंदी असेल.जर मिरवणूका काढल्या तर संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक, दिंडोरी