SET 2021 : नाशिक विभागातून ८३.५४ टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

SET 2021 : नाशिक विभागातून ८३.५४ टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीची 'सेट' परीक्षा (SET 2021) रविवारी (दि. २६) नाशिकमधील १६ केंद्रांवर पार पडली…

ही परीक्षा दोन सत्रांत होणार होती मात्र कुठलीही सुट्टी न देता एकाच सत्रात ही परीक्षा पार पडली. परीक्षेला ७०८६ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५९२० विद्यार्थी उपस्थित राहिले तर ११६६ परीक्षार्थींनी परीक्षेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

करोनामुळे (Corona) परीक्षेच्या नियमांत बदल करण्यात आले होते. दोन तासांपूर्वीच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याने दहाच्या पेपरसाठी सकाळी लवकरच परिक्षार्थी आपल्या केंद्रावर जावून थांबले होते.

महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट २०२१ (Maharashtra State Eligibility Test 2021) या परीक्षेसाठी राज्यातून ९६ हजार, तर नाशिकमधून सात हजार ८६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार रविवारी विविध केंद्रांवर परीक्षा झाली.

प्रत्येक केंद्रावर सुरक्षित अंतराचे पालन करीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दरम्यान, मार्चपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेनंतर आज परीक्षा देता आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

केवळ एकाच सत्रात परीक्षा

पहिला पेपर झाल्यानंतर परीक्षार्थींना वर्गाबाहेर न पाठवता दुसरा पेपर ११.३० वाजता घेण्यात आला. सकाळी दहा वाजता पहिला सामायिक पेपर घेण्यात आला. एक तास वेळ असलेल्या या पेपरला १०० गुणांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. दुसऱ्या पेपरच्या २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले. अशा पद्धतीने दोन्ही परीक्षा अखंड स्वरूपात घेण्यात आली.

Related Stories

No stories found.