८० वर्षीय आजोबांची करोनावर मात

रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना व प्रबळ इच्छाशक्तीच्या विचारांच्या जोरावर करोनातून झाले बरे
८० वर्षीय आजोबांची करोनावर मात

येवला | प्रतिनिधी

प्रबळ इच्छाशक्तीच्या व सकारात्मक विचारांच्या जोरावर रेमडेसिव्हिीर इंजेक्शनविना जळगांव नेऊर येथील लक्ष्मण शिंदे या आजोबांनी एचआरसीटीचा स्कोर २० असतांनाही करोना वर मात केली

जगण्याची उमेद, योग्य आहार आणि मनाची तयारी असेल तर काहीही शक्य आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात करोना उपचारासाठी दाखल असलेल्या ८० वर्षीय आजोबांनी हे दाखवून दिले आहे. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्‌याने तपासणी केली असता. शिंदे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी तातडीने विविध खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे प्रयत्न केले.

रुग्ण संख्या अधिक असल्याने त्यांना ऑक्सिजन मिळू शकला नाही. सर्व ठिकाणी नकारघंटा मिळाल्यावर अन्य डॉक्टरांनीही सांगितल्याने शिंदे यांनी मनाशी खूणगाठ बांधत सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचे ठरविले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुपास्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सर्व सर्वतोपरी प्रयत्न करत औषध उपचार करून, त्यांची प्रकृती बरी करण्यात यश मिळवले. औषध उपचार करताना रेमडेसिव्हीर सारख्या कोणत्याही इंजेक्शनचा वापर करावा लागला नाही हे विशेष.

शिंदे बाबा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले त्यावेळी त्यांच्या मनाची बरे होण्याची तयारी आणि आमचे शर्ती चे उपचार यामुळे त्यांनी कोरणा वर मात केली उपजिल्हारुग्णालयातील सर्व टीम रुग्णांसाठी शर्तीचे प्रयत्न करत उपचार करत आहे आतापर्यंत शिंदें सारखे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

डॉ. पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी येवला

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com