दिंडोरी नगरपंचायतसाठी ८० टक्के मतदान

४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
दिंडोरी नगरपंचायतसाठी ८० टक्के मतदान

ओझे | वार्ताहर oze

दिंडोरी नगरपंचायत निवडणूक Dindori Nagar Panchayat Elections अतिशय शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १२२४६ मतदारांपैकी ९७८४ (८०%) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

यंदाच्या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने मतदार मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते सकाळ पासून मतदार आणण्यासाठी धावपळ करत होते.

सकाळी थंडी असल्यामुळे सकाळच्या सत्रात अवघे १३ टक्के मतदान झाले.थंडी कमी झाल्यावर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात ५७ टक्के मतदान झाले. व दुपारी मतदानाची टक्केवारी वाढत गेली.सर्वच बुथवर मतदानाला उत्साह दिसून येत होता. त्यामुळे उमेदवारांचे मनोबल वाढत गेले.सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.

दिंडोरी नगरपंचायत साठी एकूण १७ प्रभाग असून त्यापैकी प्रभाग क्रमांक ११ व १६ यांची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारी ला होणार आहे.व प्रभाग क्रमांक १७ मधून सुजित मुरकुटे बिनविरोध निवडून आलेले आहे.

१४ प्रभागात झालेल्या मतदानात एकूण ४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहेत.

१४ प्रभागात झालेले मतदान खलीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १ - एकूण १०६४ पैकी ८६१ (८१ %)

प्रभाग क्रमांक २- एकूण १३०८ पैकी १०८९ ( ८३%)

प्रभाग क्रमांक ३- एकूण ८२२ पैकी ६६३ ( ८१% )

प्रभाग क्रमांक ४ एकूण १३२० पैकी १००२ ( ७६%)

प्रभाग क्रमांक ५एकूण ८३६ पैकी ७०२ ( ८४%)

प्रभाग क्रमांक ६ एकूण ८०१ पैकी ६३८(८०% )

प्रभाग क्रमांक ७ एकूण ७५७ पैकी ६१७( ८१ %)

प्रभाग क्रमांक ८ एकूण ४५७ पैकी ३६९ ( ८१ %)

प्रभाग क्रमांक ९ एकूण ८०५ पैकी ६०१( ७५%)

प्रभाग क्रमांक १० एकूण १०८३ पैकी ८७६( ८१%)

प्रभाग क्रमांक १२ एकूण ७९४ पैकी ५९१ (७४ %)

प्रभाग क्रमांक १३ एकूण ७५० पैकी ६३८ (८५%)

प्रभाग क्रमांक १४ एकूण ९२६ पैकी ७२१ ( ७८ %)

प्रभाग क्रमांक १५ एकूण ५२३ पैकी ४१६( ८० %) याप्रमाणे मतदान झाले आहे.

४३उमेद्वारांपैकी १४ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजपा १०, शिवसेना ८, इंदिरा काँग्रेस २, मनसे २ व अपक्ष ९ जागांवर उमेदवारी करत आहे. मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याने तोपर्यंत सर्वच उमेदवारांची निकलाबाबतची धडधड वाढणार आहे.

मतदान केंद्रावर त्यामध्ये पालखेड रोड, व निळवंडी रोड गर्दीने फुलून गेल्याने पोलीस कर्मचारी गर्दी हटविण्यात व्यस्त झाली होती.

मतदानासाठी तरुण, वयोवृद्ध, महिला, पुरुष यांनी आपल्या वैयक्तिक व मिळेल त्या वाहनाने व पायी येत मतदानाचा हक्क नोंदविला.

निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी , सहाययक निवडणूक अधिकारी नागेश येवले आदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com