नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली असून ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहे. तर ४ हजार २१६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. सर्वाधिक माघार निफाड व त्या खालोखाल सिन्नर तालुक्यातील उमेदवारांनी घेतली आहे. आता येत्या १५ जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून राजकिय धुराडा उडाला आहे. १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी १७ हजार ०४ उमेदवारांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली होती. अर्ज छाननीत ४६३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १६ हजार ५४१ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर सोमवारी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली. त्यात ४ हजार २१६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहे. निफाडमधून सर्वाधिक १ हजार ३८ व त्याखालोखाल सिन्नर तालुक्यात ८०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. रिंगणातील उमेदवारांना निवडणून चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता चित्र स्पष्ट झाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुराडा उडणार असून राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला विजयाचा गुलाल उडणार आहे.

३०८ जागा बिनविरोध

अर्ज माघारीसोबतच किती जागा बिनविरोध होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ३०८ जागांवर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे.

अर्ज बाद स्थिती

तालुका रिंगणातील उमेदवार

कळवण ३८१

येवला -

इगतपुरी ११५

दिंडोरी ८२२

त्र्यंबकेश्वर ४०

सिन्नर १७४७

निफाड १३३५

बागलाण ६८५

चांदवड ८६८

देवळा १२९

नांदगाव -

मालेगाव १८९४

नाशिक ५३३