देवळा नगरपंचायतीसाठी ७८ टक्के मतदान

३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
देवळा नगरपंचायतीसाठी ७८ टक्के मतदान

देवळा | प्रतिनिधी Deola

जिल्हाचे लक्ष लागून असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या Deola Nagarpanchayat Election पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज सकाळी ७:३० पासून मतदारांच्या उत्साहात मतदानास सुरुवात झाली .सकाळच्या सत्रात मतदारांच्या मतदान Voting करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या दुपारी १ .३० वाजेपर्यंत सुमारे ५५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ७८,४०% मतदान झाले.

देवळा येथील आजपर्यंतच्या इतिहासात पथमच देवळा शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला दिसून आला संपूर्ण निवडणूक प्रक्रियमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मतदान केंद्र परिसरात भेट देऊन पाहणी केली तर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यासाठी महिला पुरुष उमेदवारासह कार्यकत्याची उपस्थिती लक्षणीय होती .

येथील नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी ओबीसी आरक्षणाच्या ४ जागांची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाल्यानंतर उर्वरीत १३ पैकी अविरोध झालेल्या २ जागा वगळता ११ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते यात बहुतांश प्रभागातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असुन मतदार कोणाला स्विकारता हे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

[देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील जनतेने विकासाला मत दिले असून या अगोदरच १३ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ११ जागांमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला.]

देवळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ मधील एकूण मतदान व प्रत्यक्ष झालेले मतदान

वार्ड क्र:- १) ६१० पैकी ५२९ 87%

वार्ड क्र:- २)४८४ पैकी ३५४. 73.1%

वार्ड क्र:- ३) ६७४ पैकी ४९२. 73%

वार्ड क्र:- ५) ७२१ पैकी ५७२. 79%

वार्ड क्र:- ६) ४९६ पैकी ३६५ 73.5%

वार्ड क्र:- ७)६६० पैकी ५०७. 76.8%

वार्ड क्र:- ९)३५६ पैकीं २८८. 80.8%

वार्ड क्र:- ११)६४८ पैकी ५१४. 79.3%

वार्ड क्र:- १२)६६३ पैकी ५३४. 80.5%

वार्ड क्र:- १५)६२५ पैकी ४७६. 76.16%

वार्ड क्र:- १६)४३१ पैकी ३५७ 82.8%

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com