जिल्ह्यात आज ७६ करोनाबाधित

रुग्णसंख्येत होत आहे घट
जिल्ह्यात आज ७६ करोनाबाधित

नाशिक | Nashik

जिल्ह्यात (Nashik district) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Patients Decrease) रूग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली. सोमवारी दाखल झालेल्या अहवालानुसार अवघे 76 रुग्ण बाधित असल्याचे चित्र आहे.

आरोग्य विभागातील (Health Department) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी बऱ्याच प्रयोगशाळा बंद (Experimental Hall) असतात तसेच ग्रामीण भागातून स्वब येण्यास विलंब झालेला असतो. त्यामुळे ही संख्या कमी आहे. दरम्यान, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्याध्ये 6 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 234 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत 3 लाख 86 हजार 348 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 97.46 टक्कें पेक्षा अधिक आहे. नाशिक शहरात करोना आटोक्यात आला असला तरी दररोज बाजारपेठेत Crowd At Market) होणारी गर्दी तसेच कोरोना नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहराबरोबरच ग्रामिण भागातही (Rural Area) रूग्ण संख्येत चढउतार दिसत आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 76 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 29 इतकी आहे. आज ग्रामिण भागात 46 रूग्ण आढळले तर जिल्हा बाह्य बधितांमध्ये एकाचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 96 हजार 429 इतका झाला आहे. तर दिवसभरातील 6 मृत्यु झाले आहेत. यात 4 मृत्यू हे नाशिक शहरातील तर 2 हे ग्रामिण भागातील आहेत.


दरम्यान जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने 520 रुग्ण दाखल झाले आहे. यात सर्वाधिक 480 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. उपचार घेणार्‍या रूग्णांमध्येही काहीशी वाढ झाली असून हा आकडा आता 1 हजार 644 इतका झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील 614 तर ग्रामिण भागातील 944 आणि मालेगावच्या 53 रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित : 3,96,429

नाशिक : 2,27,408*

मालेगाव : 12,563*

उर्वरित जिल्हा : 1,50,977

जिल्हा बाह्य : 5,481

एकूण मृत्यू : 8,437

करोनामुक्त : 3,86,348

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com