शेतात ७५ राष्ट्रध्वज उभारून मानवंदना

शेतात ७५ राष्ट्रध्वज उभारून मानवंदना

निफाड । प्रतिनिधी Niphad

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवडी ता.निफाड येथील शेतकरी रामनाथ शिंदे ( Farmer Ramnath Shinde )यांनी त्यांच्या द्राक्षेबागेत चक्क 75 राष्ट्रध्वज ( Tricolour Flags )उभारून मानवंदना दिली आहे. तसेच शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

शेतीप्रधान देशात स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही शेती आणि शेतकरी अद्यापही पारतंत्र्यात असून त्याला त्यानेच पिकवलेल्या शेतीमालाला भाव ठरवण्याचा अधिकार नाही. कित्येक सरकारे आली आणि गेली मात्र त्यांनी शेतीसाठी ठोस असे निर्णय घेतले नाही.सरकारांनी शेतकर्‍यांचे उतारे कोरे करण्याचे निवडणूक पूर्व आश्वासन दिले होते.

मात्र अद्यापही दोन लाखाच्या वरील कर्जमाफी प्रलंबित आहे. कोरोना काळात शेतकर्‍यांना मातीमोल भावात शेती उत्पादन विकावे लागले होते. सध्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले मात्र त्यांचे अद्यापही पंचनामे नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त आहे.

संकटांत सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकार न्याय देईल का? असा प्रश्न शिंदे यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत द्राक्ष बागेला 75 ध्वज लावले आहेत, असे मत शेतकरी रामनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com