नाशिक शहरात दिवसभरात ७४६ रुग्ण बाधित आढळले; रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा

नाशिक शहरात दिवसभरात ७४६ रुग्ण बाधित आढळले; रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा

नाशिक | प्रतिनिधी

आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात १ हजार ७८१ रुग्ण करोनाबाधित आढळून आली. विशेष म्हणजे नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या लॉकडाऊननंतर सर्वात नीचांकी नोंदविली गेली असून दिवसभरात नाशिक महापालिका क्षेत्रात ७४६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत...

नाशिक शहरात दिवसभरात ७४६ रुग्ण बाधित आढळले; रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा
Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर

दुसरीकडे आज बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील १ हजार ७२३ असल्याने हादेखील मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे.

नाशिक ग्रामीण भाग मात्र अजूनही दरदिवशी १ हजाराच्या खाली रुग्णसंख्या येत नसल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ग्रामीण भागातील १ हजार २२ रुग्ण बाधित आढळून आले तर मालेगाव मनपा क्षेत्रात १३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

आज नाशिक जिल्ह्यात ३० रुग्णांनी प्राण गमावले. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील ८, मालेगाव मनपा क्षेत्रातील ०२ तर नाशिक ग्रामीणमधील २० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्हात आतापर्यंत एकूण ४ हजार १३० रुग्णांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com