ग्रामिण पोलीसांसाठी 70 ऑक्सिजन बेड;  आडगाव मुख्यालय येथे कोवीड सेंटर सुरू

ग्रामिण पोलीसांसाठी 70 ऑक्सिजन बेड; आडगाव मुख्यालय येथे कोवीड सेंटर सुरू

नाशिक। प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालाजवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोलिसांसाठी सत्तर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली होती.

त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.दिघावकर यांनी उदघाटन केल्या नंतर त्या स्थळी पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सदर कोविड सेंटर मध्ये एकूण 70 बेड असून ते सर्व ऑक्सिजन बेड आहेत.यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात राहणार असून तीन डॉक्टर यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे पीजेडपी पॅटर्न नाशिकला पहिल्यांदाच बघायला मिळाले असल्याचे प्रतिपादन डॉ.दिघावकर यांनी केले.

ग्रामीण पोलीस मुख्यालायजवळ कोविड सेंटर साकारताना जिल्हा परिषदेची मोठी मदत झाली.याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना मोफत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागेल. सुविधा व उपचार बाबतीत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगीतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com