जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 677 रुग्ण
USER

जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 677 रुग्ण

433 जणांची मात, 64 मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा कहर ओसरल्यानंतर मागील मे-जून महिन्यात कोरोना पश्चात म्युकोर मायकोसिस ( mucormycosis) (काळी बुरशी) रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 677 म्युकोर मायकोसिसचे रूग्ण आढळून आले आहेत. यातील 433 जणांनी यावर मात केली आहे. तर 64 जणांचा यामध्ये मृत्यु झाला आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यात अचानक रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ झाली तसेच 6 हजार जणांचा करोना मुळे मृत्यु झाला. करोनाशी लढतानाच मे महिन्यात जिल्ह्यात म्युकोर मायकोसिसचे रूग्ण आढळून आले.

नाकाची पोकळी, डोळ्यांची मागील बाजु तसेच मेंदुकडील नसमध्ये ही बुरशी आढळुन आली. अचानक काही रूग्णांना अंधत्व आले तर अनेकांचे डोळे काढावे लागले. काहींचा नाकाचा भाग काढावा लागला. करोनासाठी लढत असतानाच यानंतरही प्रामुख्याने मधुमेह असणार्‍या रूग्णांना म्युकोर मायकोसिस होत असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली होती.

जिल्हास्तरावर यासाठी टास्कफोर्स निर्माण करण्यात येऊन अशा रूग्णांना कमी खर्चात उपचार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार त्वरीत योग्य नियोजन प्रणाली स्थापित करून मुकोरं मायकॉसिस् जिल्हा समन्वयक कान नाक घसा तज्ज्ञ डॉ संजय गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील सर्व खाजगी कान नाक घसा तज्ज्ञ, दंत शल्य विशारद, नेत्र शल्य विशारद व दोन्ही वैद्यकिय महाविद्यालये वैद्यकिय महाविद्यालय इगतपुरी व डॉ वसंत पवार वैद्यकिय महाविद्यालय, आडगांव नाशिक यांचेशी समन्वय साधून रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया व्यवस्था करून पुढील लागणारे इंजेक्शन चे योग्य पुरवठा व वितरण व्यवस्था नियोजन करण्यात आले.

परिणामी मे- जून महिन्यात झालेली वाढ आता नियंत्रणात आणली असून दिवसातून फक्त 1-2 संशयीत रूग्ण आढळत आहेत. आजपर्यंत 415 रुग्णांवर शस्त्रक्रिया झालेल्या असून 12 हजारापेक्षा जास्त इंजेक्शन पुरवण्यात आलेले आहेत तसेच नाशिक महापालिका अंतर्गत येणार्‍या खाजगी रूग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय यांना महात्मा ज्योतिबा राव फुले जन आरोग्य योजने मार्फत अंदाजे 100 रूग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

70 टक्के रूग्ण बरे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के अधिक वाढले असून पुढील 1 महीन्यात 100 टक्के बरे होतील. नाशिक जिल्हा कान नाक घसा संघटना यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले तसेच वेळोवेळी इन्जेक्शनचा नियमित पुरवठा करणारे उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ नाशिक विभाग, नाशिक यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले

डॉ. संजय गांगुर्डे, जिल्हा समन्वयक (मुकोर मायकोसिस) जिल्हा रुग्णालय नाशिक

बरे झालेले रूग्ण असे

नाशिक मनपा- 308

जिल्हा रूग्णालय- 45

मालेगाव मनपा- 7

एसएमबीटी रूग्णालय- 23

पवार मेडिकल कॉलेज- 32

ग्रामिण रूग्णालये- 13

उपजिल्हा रूग्णालय- 5

एकूण- 433

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com