वयवर्ष ६७, बारा दिवस न थकता चालवली सायकल

सरदार मोहिंदर सिंह भारज यांची विश्वविक्रमाला गवसणी
वयवर्ष ६७, बारा दिवस न थकता चालवली सायकल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील आणखी एका सायकलीस्टने (Nashik Cyclist) नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, ६७ व्या वर्षी काश्मीर (Kashmir To Kanyakumari) ते कन्याकुमारी हे अंतर अवघ्या बारा दिवसांत पार करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे...

सरदार मोहिंदर सिंह भारज (Sardar Mohindar sing bharaj) असे या ज्येष्ठ सायकलीस्टचे नाव आहे. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे 3 हजार 500 किमीचे अंतर अवघ्या 12 दिवस 18 तास 57 मिनिटात पार केले.

त्यांच्या या कामगिरीने अमेरिकेतील WUCA च्या विश्वविक्रमाला गवसणी (World Record) त्यांनी घातली आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सरदार मोहिंदरसिंग भारज नाशकात पोहोचले. यावेळी कृषीनगरच्या सायकल सर्कल (Krishinagar Cycle Circle) येथे नाशिकच्या सायकलीस्टकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

अशी झाली राईड

२५ ऑक्टोबर श्रीनगरच्या लाल चौक (Shrinagar Lal chauk) मधून कन्याकुमारीकडे जाण्यासाठी सुरुवात झाली. ही राईड ७ नोव्हेंबरच्या पहाटेला दोनच्या सुमारास संपली. मार्ग खडतर होता; खूप अडचणी आल्या पण चांगल्या पद्धतीने ही राईड पूर्ण केली.

वयाचा विचार करू नका

कुठलेही चांगले काम करताना वयाचा विचार करू नका. आपले वय नेहमी आपल्याला खाली बसवण्याचा प्रयत्न करते. परंतु, कितीही वय झाले तरी न खचता तितक्याच उर्जेने आणि उत्साहाने पुढे जावे. माझे वय ६७ असूनही मी आज ही राईड पूर्ण करू शकलो हे माझे भाग्य आहे.

सरदार मोहिंदर सिंह भारज, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com