नाशिक । कुंदन राजपूत

महाविकास आघाडी सरकारने मागील भाजप सरकारची 'जलयुक्त शिवार' योजना गुंडाळल्याने या योजनेसाठि विविध कंपन्या व धार्मिक संस्थाकडून मिळालेला लाखोंचा 'सीएसआर' निधी वापराविना तसाच बॅक खात्यात पडून आहे.

जिल्ह्याला या योजनेच्या कामासाठी मिळालेला पाच कोटी 12 लाखांपैकी 67 लाख 43 हजारांचा निधी वापराविना शिल्लक आहे. योजनांच गुंडाळल्याने हा निधी सबंधित कंपन्या व देवस्थांनाकडे परत पाठवला जाण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मजलयुक्त शिवारफ ही महत्वकांक्षी योजना होती. मपाणी आडवा, पाणी जिरवाफ हा हेतु डोळ्यासमोर ठेवून बंधारे बांधणे, तलाव साफसफाई करुन पाणी साचवणे ही कामे या योजनेअंतर्गत राज्यभर मोठया प्रमाणात करण्यात आली. या कामांसाठी विविध कंपन्या व धार्मिक देवस्थांनानी मोठया प्रमाणात मसीएसआरफ निधी उपलब्ध करुन दिला.

नाशिक जिल्ह्यासाठी मागील पाच वर्षात जलयुक्तच्या कामासाठी पाच कोटी 15 लाख 21 हजार मसीएसआर निधी उपलब्ध झाला. त्यात प्रामुख्याने श्री सिध्दी विनायक मंदिर, साईबाबा शिर्डी देवस्थान, जवाहरलाल नेहरु पोर्ट, हिंदुस्थान पेट्ोलियम व भारत पेट्ोलियम, मायलॅन लॅबरोटरीज, एचएएल यांच्याकडून मोठया प्रमाणात निधी देण्यात आला. एकूण प्राप्त निधीपैकी चार कोटी 47 लाख 78हजार इतका निधी जलयुक्तच्या कामांवर खर्च झाला.

पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर यांसह इतर तालुक्यांमधे बंधारे बांधणे, तलावांची डागडुजी करुन पाणी साठवण क्षमता वाढविणे, समतोल चर खोदणे ही कामे करुन भुजल पातळी वाढविण्यात आली.

मात्र, कॅगने राज्यभर या योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवल्याने विद्यमान महाविकास आघाडी सरकारने ही योजना गुंडाळत या योजनेची चौकशी लावली. योजनाच बंद केल्याने वरील कंपन्या व धार्मिक संस्थांनी जिल्ह्यासाठी दिलेला 67 लाख 43 हजाराचा निधी तसाच वापराविना पडून आहे. हा निधी शासनाकडून मसीएसआरफ निधी अंतर्गत इतर विकास कामांसाठी वर्ग केला जाऊ शकतो. अथवा वरील कंपन्या व धार्मिक संस्था हा निधी परत देखील घेउ शकतात.

जलयुक्तसाठी प्राप्त निधी

श्री सिध्दि विनायक मंदिर

प्राप्त- 21911765

शिल्लक - 252510

शिर्डी साईबाबा मंदिर

प्राप्त -10000000

शिल्लक -244527

जवाहरलाल नेहरु पोर्ट

प्राप्त - 5000000

शिल्लक - 5000000

हिंदुस्तान पेट्ोलियम

प्राप्त - 1250000

शिल्लक -675512

भारत पेट्ोलियम

प्राप्त - 500000

शिल्लक - 500000

डेल्टा फाईनोकेम प्रा.लि

प्राप्त - 1000000

शिल्लक - 70885

मायलॅन लबोरेटरीज

प्राप्त - 10000000

शिल्लक - 0

एचएएल

प्राप्त - 1859765

शिल्लक - 0

कंपन्या व धार्मिक संस्थांनी दिलेला ‘सीएसआर’ निधी मुख्यमंत्री सहायता निधीत खात्यात जमा होतो. जिल्ह्याला मागील पाच वर्षात पाच कोटी 15 लाखांचा निधी प्राप्त झाला. त्यावर पाच वर्षात 45 लाखांचे व्याज जमा झाले आहे. त्यामुळे शिलकी 67 लाख व व्याजाचे 45 लाख असा एकूण 1 कोटी 7 लाख 95 हजार असा मजलयुक्तफचा निधी वापराविना बॅक खात्यात पडून आहे.