नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमध्ये (MPA) आज ६६८ पोलीस उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्रातील प्रशिक्षणार्थी पोलीस दलात सामील झाले. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे पोलीस सेवा बजावणार आहेत...
.खरा पोलिस व चित्रपटातील पोलिसात फरक.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम युट्युबवर लाईव्ह करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहुन ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलीस महासंचालक

संजयकुमार यांचीही उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मानवंदना स्वीकारली तर प्रशिक्षण अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

या कार्यक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींची नावे पुकारत त्यांचा गौरव केला गेला. यामध्ये मानाची रीव्होलवर, उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहिल्यादेवी होळकर कप या तीनही पुरस्काराची मानकरी शुभांगी शिरगावे यांना प्रदान करण्यात आला. तर सलीम शेख यांना उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले.

तर अविनाश वाघमारे यांना द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पोलीस दलात सामील झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांना संबोधित केले.

याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.