ग्रामपंचायतींना ६५ कोटी वितरीत

जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर
ग्रामपंचायतींना ६५ कोटी वितरीत
ग्रामपंचायतींना ६५ कोटी वितरीत

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना ६५ कोटी वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांनी दिली.

नाशिक जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला अबंधीत निधी हप्ता यापूर्वी वितरीत करण्यात आलेला आहे.

शासन स्तरावरुन पंधराव्या वित्त आयोगातील दुस-या हप्त्याची रक्कम रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार देखील प्राप्त झाला असून जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये ग्रामपंचायत स्तरावर निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत कोवीड-१९ आजाराच्या साथरोग काळात शासन स्तरावरुन इतर योजनांमधून निधी उपलब्ध होण्यास अडचणी असतांना केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतुन महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याकामी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायत यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता.

नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड-१९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानूसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोग अंतर्गत पहिल्या व दुसऱ्या हप्ताच्या प्राप्त निधीचे ग्रामपंचायतींना वितरीत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँक खाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करुन प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिशाचा प्रथम व व्दितीय हप्ता प्राप्त झाला आहे.

यापुढेही १५ व्या वित्त आयोगाच्या वेळोवळी प्राप्त होणाऱ्या निधीचे वितरण तात्काळ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली.

लोकहिताचे कामे हाती घ्यावी जिल्हयात कोवीड-१९ प्रादुर्भाव पार्शभुमीवर, गावातील सध्याच्या परिस्थतीचे विश्‍लेषण करुन गावाच्या गरजा ओळखून कामे घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी कामे सुचवा व ग्रामविकासाची अत्यावश्यक कामे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घेण्यात येऊन विहित वेळेत निधी खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी. १५ व्या वित्त आयोगातील वितरीत करण्यात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या हत्याच्या बंधित -अंबधित निधी खर्चाबाबत लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन लोकहिताचे कामे हाती घेण्यात यावे.

बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद स्तरावर पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अबंधित निधीचा पहिला हप्ता ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वी वितरीत केला असुन दुसरा बंधीत निधी हप्ता ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम ग्रामपंचायत स्तरावर खर्चाबाबत नियोजन करुन जनहिताची कामे सदर निधीतुन विहीत वेळेत होतील, याबाबत गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com