मविप्रच्या कोव्हिड रुग्णालयात ६३६ रुग्णांची करोनावर मात

मविप्रच्या कोव्हिड रुग्णालयात ६३६ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविदयालयाच्या रुग्णालयात ९०१ कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात ६३६ रुग्ण बरे झाले असून यात पोलीस व त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे.

तर महाविद्यालयातील कोविड टेस्टिंग लॅब मध्ये जुलै अखेर तेरा हजार चाळीस रुग्णांचे करोना स्वॅब टेस्ट करण्यात आले आहेत.

महाविद्यालयाच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) ६० खाटा तर कोविड केयर सेंटर मध्ये १०० खाटांचे रुग्णालय आहे.

या कोविड रुग्णालयातील डीसीएच मध्ये अति गंभीर बाधित रुग्णांसाठी आरआयसीयु या विशेष अतिदक्षता कक्षात चोवीस तास तज्ञ् डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार केले जातात. निवासी डॉक्टर ,फिजिओथेरपी,नर्सिंग,परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्या सेवा तसेच डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या सुसज्ज कक्षात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा , व्हेंटिलेटर , मोबाईल एक्स-रे , लॅब अश्या सुविधा चोवीस तास उपलब्ध आहे.

तसेच वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासोबतच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतांना चांगल्या दर्जाचे जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी , गरम पाणी पुरविले जात आहे. मविप्रच्या रुग्णालयात मागील १ मेला पहिला करोना बाधित रुग्ण दाखल झाला होता.

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या प्रारंभी च्या काळात कोरोना विषयक स्वतंत्र स्क्रिनिंग ओपीडी सुरु करण्यात आली.

ती आजही सुरु असून या ठिकाणी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येते व प्राथमीक लक्षणे असलेली व संशयित रुग्णांना वेगळे करण्यात येते. आजवर या कोविड बाह्यरुग्ण विभागात जुलै अखेर ८१७५ इतक्या रुग्णांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा कश्या पुरविता येईल, या करीता अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील,शिक्षणाधिकारी डॉ- नानासाहेब पाटील व हॉस्पिटल ची सर्व टीम अहोरात्र काम करुन डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत आहेत. तसेच महाविद्यालयाच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येक बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार आणि सोयी- सुविधांबाबत संवाद साधला जात आहे. आतापर्यंत ६६३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे
नीलीमाताई पवार, सरचिटणीस, मविप्र.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com