ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण
नाशिक

ऑनलाईन साधनाविना ६३ टक्के विद्यार्थी

जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांना मदतीचे आवाहन

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शाळांमध्येही ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरू आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या ३७ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी तांत्रिक साधने उपलब्ध असून उर्वरित ६३ टक्के विद्यार्थी या साधनांपासून वंचित आहेत.

त्यामुळे ‘डोनेट अ डिव्हाईस’ या चळवळी अंतर्गत या गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षणाची साधने पोहचावीत, यासाठी डोनेट व डिव्हाईस या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४४दात्यांनी तांत्रिक साधनांची मदत केली आहे. यामध्ये २८ स्मार्ट मोबाईल फोन, ५ साधे मोबाईल्स, २ टीव्ही, ३ कॉम्प्युटर, १ लॅपटॉप, ३ पेन ड्राईव्ह, १ स्पीकर, १ वर्कबूक असे साहित्य आतापर्यंत नागरीकांच्या मदतीने उपलब्ध झाले आहे.जुलै महिन्याच्या सुरूवातीला जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व लोकप्रतीनिधींच्या उपस्थितीत या उपक्रमात सुरूवात झाली होती. यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणास गती देण्यासाठी स्वत: साधने भेट देत उपक्रमास सुरूवात केली होती.

दरम्यान,अद्यापही कोवीड-१९ चा ज्वर ओसरलेला नाही. उलट ग्रामीण भागामध्ये हा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. या स्थितीत बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी व श्रमिक कुटूंबांमधील आहेत. त्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र स्मार्ट मोबाईल वापरणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अद्यापही नागरिकांच्या पुढाकाराची गरज आहे.

मदतीचे आवाहन

‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या ब्रीदवाक्याखाली सुरू असलेल्या डोनेट अ डिव्हाईस या उपक्रमास नागरिकांनी प्रतिसाद द्याव, असे आवाहन करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमात मदत करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com