नाशिक जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस

नाशिक जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस
नाशिक पाऊस

नाशिक | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) सुरु असलेल्या संततधार पावसाने ६३ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावत आहे. काल नाशिकला (Nashik) २६, इगतपुरीत (Igatpuri) ४३, दिंंडोरीत (Dindori) ३३, पेठला (Peth) ३१, त्र्यंबक ला १९ नांदगावला ७४, कळवणला ६०, बागलानला ३०, सुरगाण्यात ४६, देवळ्यात ३३, निफाडला २२, सिन्नरला ३७, येवल्यात ३७, चांदवड (Chandwad) १३ मिलीमिटर पावसाची नोंंद झाली. एकाच दिवशी ५०४ मिली मिटर पाऊस पडल्याने सरसरी पाऊस ६३ ट्क्के झाला आहे.

दारणातुन आजही १५० क्युसेक्स पाणी सोडले. नांदुरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwer) मधुन १००९, भावली धरणातुन १३५, वालदेवीतुन ६५, पाणी सोडले आहे. पालखेड मधून ३९१ क्यूसेस पाणी सोडले. हरणबारितूनही १६४३ क्यूसेस पाणी वाहत आहे. गंगापूर ८५ टक्के भरले आहे.

नाशिक मध्ये आज दिवसभार पावसाने विश्रांती घेतली. पण ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला. त्यामुळे शहरातील वर्दळही बरीच कमी होती. धरणातून पाणी सोड्ल्याने ग्रामीण भागात (Rural Area) नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com