एज्युकेशन कॅम्पस रस्त्यासाठी 63 लाख रु.मंजूर
नाशिक

एज्युकेशन कॅम्पस रस्त्यासाठी 63 लाख रु.मंजूर

Nitin Gangurde

दिंडोरी l प्रतिनिधी Dindori

महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांमुळे एस.आर निधीतुन मविप्र एज्युकेशन कॅम्पस रस्त्यासाठी 63 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव, दिंडोरीच्या नगराध्यक्षा रचना जाधव यांनी दिली.

इंदिरानगर ते मविप्र कॉलेजपर्यंत चांगला रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना व शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

या रस्त्यासाठी दत्तात्रय जाधव, बाळासाहेब साठे, नगरसेवक संतोष गांगोडे, नगरसेवक धनंजय भवर आदींनी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य अविनाश जाधव यांनी ना.नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला. ना.झिरवाळ यांनी दिंडोरीकरांच्या मागणीची दखल घेतली. एस.आर.निधीतून या रस्त्यासाठी 63 लाख रुपये मंजूर झाले आहे.

उमराळे रस्ता ते भवानी नगर मार्गे आयटीआय, ईशान्येश्‍वर विद्यानिकेतन, वाघाड कॅनॉल ते मविप्र महाविद्यालयपर्यंत हा रस्ता डांबरीकरण होणार आहे. दिंडोरी शहरातील एज्युकेशन कॅम्पसमध्ये रेलचेल वाढणार आहे.

या रस्त्यामुळे आयटीआय, ज्युपीटर इंग्लिश मिडीयम स्कूल, मविप्र महाविद्यालय ही शैक्षणिक संकुले जोडली जाणार आहे. पण त्याचबरोबर एज्युकेशन कॅम्पस परिसरात राहणार्‍या सर्व शेतकर्‍यांंना दळणवळणाचा फायदा होणार असल्याचे अविनाश जाधव, नगराध्यक्षा रचना जाधव यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com