जिल्ह्यात २४ तासांत ६०३ नवे करोना रुग्ण
नाशिक

जिल्ह्यात २४ तासांत ६०३ नवे करोना रुग्ण

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ६०३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा १९ हजार ५५० इतका झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात एकूण ६०३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ४०९ रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा १३ हजार २७८ वर पोहोचला आहे.

आज ग्रामीण भागातील १८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा ४ हजार ६०१ झाला आहे. मालेगावात आज ४ रुग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार ४९३ झाला आहेे.

जिल्हा बाह्य रुग्णांचा आकडा १७८ झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील ६२९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोनामुक्त होणार्‍यांचा आकडा १४ हजार ६४५ वर पोहोचला आहे. आज करोनामुळे २४ तासांत ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १ नाशिक शहरातील असून ग्रामीण भागातील ५ व जिल्हा बाह्य एकाचा सामावेश आहे.

आज एकाच दिवसात नव्याने ८४३ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक ५४६ तर ग्रामीण जिल्ह्यातील १३० आहेत. जिल्हा रुग्णालय १३, मालेगाव ३१, डॉ. वसंतराव पवार रुग्णालय १८ व होम क्वारंटाईन १०५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोनाबाधित १९,५५०

नाशिक १३,२७८

मालेगाव १४९३

उर्वरित जिल्हा ४६०१

जिल्हा बाह्य १७८

एकूण मृत्यू ५९२

करोनामुक्त १४,६४५

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com