एचआरसीटी स्कोर २२, तब्बल ७५ दिवस करोनाशी लढत झाले 'करोनामुक्त'

एचआरसीटी स्कोर २२, तब्बल ७५ दिवस करोनाशी लढत झाले 'करोनामुक्त'

चिचोंडी | वार्ताहर

घरच्यांचे पाठबळ, नातलगांचा धीर, यामुळे आपण बरे आहोत. ७५ दिवस मी उपचार घेतले यानंतर मला आता बरे वाटते आहे. मी बरा आहे मला काही झालेले नाही व होणारही नाही अशी मनात बांधलेली खूणगाठ व योग्य उपचार या त्रिसूत्रीमुळे आपण पूर्णपणे बरे झालो आहोत. असे उद्गार काढले आहेत चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) येथील ६० वर्षीय शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब पानगव्हाणे यांनी. करोनाला तब्बल ७५ दिवस हिंमतीने तोंड देत हरवले असल्याचे ते सांगतात...

शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब पानगव्हाणे हे पत्नी व दोन मुले, सुना व नातवांसह राहतात. मात्र मार्च महिन्यात अचानक त्यांची तब्येत खालावली त्यांनी गावातील डॉक्टरकडे प्राथमिक उपचार घेतले.

यानंतर त्या डॉक्टरांनी कोविड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे त्यांचे इन्फेक्शन वाढलेले होते. त्यांचा एचआरसिटी स्कोर २२ तर ऑक्सिजन लेवल ८० पर्यंत खाली आली होती.

अशा परिस्थितीत येवल्यात बेड न मिळाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे तेरा दिवस उपचार करण्यात आले. या उपचारादरम्यान त्यांची फारशी सुधारणा झाली नसली तरी तुम्ही पेशंटची घरी योग्य काळजी घ्या असे डॉ.नी सांगितले.

यानंतर घरी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि पेशंट सोबत घ्यावयाची काळजी याची पूर्णता जबाबदारी घरच्यांनी योग्यरीत्या घेतली.

ऑक्सिजन मिळवण्याकरिता गावे पालथी घातली. याकाळात त्यांच्या फूफुसाला इजा झाल्याने व त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने मुलगा सतीश, योगेश, भाचे मनोज मढवई व नातलग यांनी रात्री त्यांना येवला येथील दवाखान्यात दाखल केले.

येथील डॉक्टरांनी त्यांची योग्य ट्रीटमेंट करत कधी घरी, कधी दवाखाना असा उपचार सुरु केला. मृत्यूच्या दाढेत असलेले पानगव्हाणे आज परिस्थिती नसतांना ७५ दिवसांच्या संघर्षमय लढयात कोरोनावर मात करून सुखरूप घरी आले आहेत.

पेशंटने धीर सोडला नाही तर नक्कीच यश येते असे यावेळी डॉ. शहा यांनी म्हटले. आज पेशंटला पूर्णतः बरे होताना पाहून पानगव्हाणे परिवारातील मुलगा सतीश पानगव्हाणे, योगेश पानगव्हाणे, पत्नी चंद्रकला यांच्यासह नातेवाईकांना ही आनंद झाला. घरी आल्यावर त्यांचे औक्षण करण्यात आले.

मृत्युच्या दाढेतून परत येणारे रुग्ण असे खूप कमी आढळतात. हा रुग्ण नाशिकच्या मोठ्या दवाखान्यात घरी परत आलेला होता. योग्य काळजी घेतली आणि धीर न सोडल्यामुळेच रुग्णाने करोनावर मात केली. यावेळी रुग्ण कुणाचाही सहारा न घेता ऑक्सिजनविना रुग्णालयातून सुट्टी घेऊन निघाले. यादरम्यान येथील डॉक्टरांना या रुग्णाचा उत्साह पाहताना विशेष वाटले. येथील डॉक्टरांनी या रुग्णाचा एक कडक सेल्फी घेत दवाखान्यातून रुग्णाची सुट्टी केली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com