दिलासा : आठ तालुक्यात ६० टक्के रेशनचे वितरण

दिलासा : आठ तालुक्यात ६० टक्के रेशनचे वितरण

नाशिक । प्रतिनिधी

रेशनकार्ड धारकांना ऐन दिवाळीत धान्य मिळणार की, नाही याची शाश्वती नसताना अखेर दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत नाशिक आणि मालेगाव शहरासह जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येक दुकानात १०० टक्के धान्य पोहचले आहे.

उर्वरित आठ तालुक्यातही धान्याच वितरण सुरु असून आतापर्यंत ६० टक्के माल त्यांच्यापर्यंच पोहचला आहे. म्हणजे २६०९ दुकनांपैकी तब्बल २०८३ दुकानांत पूर्ण माल पोहचल्याने आता गोरगरिब रेशनकार्ड धारकांना ऐन दिवाळीत धान्य उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

पंजाबमधील किसान आंदोलनामुळे जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रेशनचे धान्यच उपलब्ध होऊ शकले नव्हते. आणि ते मिळण्याबाबतही शंकाच निर्माण झाली होती. एफसीआयला प्रशासनाकडून इतर राज्यांतून धान्य उपलब्धीसाठी गळ घालण्यात आली होती.

सर्व प्रयत्नांनंतर अखेर मनमाड येथील एफसीआयच्या गोदामातून धान्य उपलब्ध झाले. तेथून वाहतूकीसाठी ट्रक आणि इतर मालवाहू गाड्याही मोठ्या दिव्यानंतर उपलब्ध झाल्या. शिवाय गाड्यांची संख्या कमी असल्याने हमालांनी दिवसरात्र काम करुन प्रत्येक गाडी खाली करत, भरुन देत दिवाळीपुर्वी जवळपास निम्म्या जिल्ह्यात १०० टक्के धान्य पोहचविले.

तर उर्वरित भागात ६० टक्क्यांपेक्षा जास्त धान्य वितरीत केले. म् त्यामुळे आता कुठे या गोरगरिब नागरिकांना रेशनवरील धान्य दिवाळीत उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच आता दोन दिवसांपासून रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

या तालुक्यात पोहचले शंभर टक्के धान्य

नाशिक शहरासह तालुक्यात, मालेगाव शहरासह तालुक्यात, निफाड, देवळा, कळवण , त्र्यंबक, येवला, शंभर टक्के रेशनचे धान्य पोहचले आहे.

येथे ६० टक्के माल पोहचला

पेठ, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, बागलाण, या तालुक्यात ६० टक्के माल पोहचला आहे.

ऐन दिवाळीत पंजाबमधील किसान आंदोलनामुळे अडचणी निर्माण झाली होती. पण अन्न महामंडळाने मनमाड येथून माल उपलब्ध करुन दिला. आमच्या हमालांसह संपूर्ण यंत्रणेने दिवसरात्र काम करुन गोरगरिबांना रेशनचे धान्य पोहचविले आहे. २६०९ पैकी २०८३ दुकानांत माल पोहचला आहे. ८० टक्के मालाचे वितरण झाले आहे. २० टक्के पुढील दोन दिवसांत होईल. सुटीच्या दिवशी उद्याही गोदामांसह वाटपही आम्ही सुरु ठेवणार आहोत.

अरविंद नरसिकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com