आडगावला ६० किलो गांजा जप्त; संशयित पसार

आडगावला ६० किलो गांजा जप्त; संशयित पसार

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

आडगाव शिवारातील (Adgaon Shivar) नववा मैल परिसरात रस्त्यावर संशयास्पद उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये (Innova car) तब्बल ६० किलो बेवारस गांजा (Drugs) आढळून आला आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळावरून सहा लाख रुपये किमतीचा गांजासह सात लाख रुपयांची कार असा एकूण सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे...

या बेवारस गांजा प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ कायदा कलम अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. सदर गांजा कुठून आणला व कोणाला पुरविला जात होता याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, दिनकर भुसारे आदी कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना नववा मैलजवळ एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार पार्किंग लाइट सुरू करून उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडीत दोन गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसून आल्या. ही माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे (Ashok Sakhre), सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (Hemant Todkar), पोलीस उपनिरीक्षक हेमलता उबाळे (Hemalta Ubale) यांना कळविण्यात आली.

त्यानंतर पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला असता मागील सीटवर दोन गोण्या आढळून आल्या त्या गोण्या उघडून बघितल्या असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमाराला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना गांजा वाहतूक करणाऱ्या संशयितांनी लांबून येणारे पोलीस वाहन बघितले. त्यानंतर गाडीमध्ये गांजाचे पोते तसेच ठेवून गाडी सोडून पलायन केले. गाडी मालेगावच्या (Malegoan) दिशेने जात असल्याने संशयित मालेगाव भागातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com