नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटामुळे मरगळलेल्या सराफ बाजाराला गुरुपुष्यामृत मुहूर्ताने मालामाल केले. वर्षातील पहिल्याच गुरूपुष्यामृतचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सराफा बाजारात जोरदार सोने खरेदी केली. 60 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिक चेतन राजापूरकर यांनी दिली...

नाशिककरांनी चोख सोने खरेदीला पसंती दिली. सोने ५० हजार ८०० रूपये जीएसटीसह प्रती तोळा भाव होता. दोन महिन्यांपासुन सराफा बाजारात सोने, चांदीच्या दरात मोठे चढ उतार होत आहेत.

त्यामुळे ग्राहक व गुंतवणूकदारांना देखील खरेदी केव्हा करावी, असा प्रश्न पडला होता. परंतु गुरूपृष्यामृत आणि सोने खरेदी हे एक समिकरणच बनले आहे.

परिणामी नवीन वर्षातील पहिल्याच गुरूपृष्यामृतला सराफा बाजारासह परिसरातील पेढ्यांमध्ये ग्राहकांची सोने, चांदीचे दागिने खरेदीसाठी गर्दी झाली होती. लग्न तिथीमुळे अनेकांनी गुरूपृष्यामृतचा मुहर्त साधला.

आता पुढील गुरूपुष्यामृताचा मुहर्त २५ फेब्रुवारीला आहे. लग्नतिथी, गुरूपृष्यामृत योग आणि आगामी काळात मिळत असलेले भाववाढीच्या संकेतामुळे ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहर्त साधला.

दिवाळीप्रमाणाचे गुरुपुष्यमृतचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदी केली. बाजारात सोने विक्रीतुन मोठी उलाढाल झाली. बाजारात 60 कोटीहून अधिक उलाढाल झाली.
चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ संघटना