दिवसभरात जिल्ह्यात 6 हजार 845 पॉझिटिव्ह

मृत्युचा आकडा पुन्हा 40 च्या घरात
दिवसभरात जिल्ह्यात 6 हजार 845 पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. याबरोबर ग्रामिण भागात हा प्रसार वाढला आहे. आज एकाच दिवसात पुन्हा एकदा 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हमध्ये हजाराने वाढ होऊन हा आकडा 6 हजार 845 पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह येणारांची संख्या 2 लाख 70 हजार 615 इतकी झाली आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी यात घट होऊन हा आकडा 4 हजार 718 इतका झाला होता. परंतु आज यात दोन हजारने वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 117 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 26 हजार 485 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 6 हजार 845 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 3 हजार 870 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 64 हजार 173 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 748 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 92 हजार 311 झाला आहे. मालेगावात 161 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 461 झाला आहेे. जिल्हा बाह्य 66 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 670 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील सर्वाधिक 21 रूग्ण, ग्रामिण भागातील 19 रूग्णांचा सामावेश आहे.

यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 975 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 6 हजार 757 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 6 हजार 456 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 233 तर मालेगाव येथील 45 रूग्ण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com