सुरगाण्यात नुकसान भरपाईसाठी सहा कोटी मंजूर

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा
सुरगाण्यात नुकसान भरपाईसाठी सहा कोटी मंजूर

सुरगाणा । Surgana

सुरगाणा तालुक्याला (Surgana Taluka) तौक्ते चक्रीवादळाचा (Taukte Cyclone) चांगलाच फटका बसला आहे. वादळीवार्‍यामुळे घरांच्या नुकसानीसह (Damage to houses) शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान (Damage to agriculture, orchards, vegetables) झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने सुरगाणा तालुक्यातील नुकसान भरपाई (Indemnity) पोटी शासनस्तरावरुन 6 कोटी 68 लाख 26 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी दिली.

नुकसानग्रस्त ठिकाणी आमदार नितीन पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आणि नुकसानग्रस्त (Damaged Area)जनतेला त्यांनी आश्वासन दिले होते. नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, या शब्दाला मान ठेवून आणि आमदार नितीन पवार यांनी शासनस्थरावर्ती पाठपुरावा करून कळवण तालुक्यासाठी (Kalwan Taluka) 133 घराच्या नुकसान भरपाई 16 लाख 95 हजार तर आंब्याच्या नुकसान भरपाई पोटी 1. 80 हेक्टरी 90 हजार रुपये तर सुरगाणा तालुक्यातील नुकसानी पोटी 424 घरांचे नुकसान झाले असून शासनाकडून 63 लाख निधी 60 हजार रुपयेनिधी मंजूर झाला आहे.

सुरगाणा तालुकतातील 1208 हेक्टर क्षेत्रातील 5484 शेतकर्‍याच्या आंबा पिकाच्या नुकसान (Damage to mango crop) भरपाई पोटी शासनस्तरावरून 6 कोटी 4 लाख 510 रुपये नुकसान भरपाई मंजूर करून आणण्यात आमदार नितीन पवार यांना यश आले आहे. आदिवासी जनतेला (Tribal Area) मोठा दिलासा मिळाला आहे. नुकसान भरपाई मंजूर करून आणल्याची माहिती मिळताच नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाने आमदार नितीन पवार यांचे आभार मानले.

मागील महिन्यात तौक्त चक्री वादळाने आमच्या सुरगाणा तालुक्यात भरपूर प्रमाणात घरांचे व आंब्याचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनस्तरावर कळवण- सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांनी पाठपुरावा करून सुरगाणा तालुक्यातील मोठा दिलासा देत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी वर्ग आभार मानतो.

- राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक सुरगाणा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com