जिल्ह्यात आढळले ५९ करोनाबाधित

जिल्ह्यात आढळले ५९ करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५९ रुग्ण करोनाबाधित (Corona Positive) झाले असून शहरात (Nashik City) करोनाबाधितांची संख्या २२ आहे. तर ग्रामीण भागात (Nashik Rural) ३५ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार २ नागरिक उपचार घेत आहेत....

गेल्या २४ तासात एकूण ५९ रुग्ण बाधित झाले तर ६३ रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. शहरात २२, ग्रामीण भागात ३५, तर मालेगाव (Malegoan) आणि जिल्हा बाह्य प्रत्येकी १ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४ हजार ६६३ रुग्ण बाधित तर ३ लाख ९५ हजार १०० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज जिल्ह्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे दोन्ही ग्रामीण कार्यक्षेत्रातील आहेत. शहर आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या ८ हजार ५६१ इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com