सिन्नर करोना
सिन्नर करोना
नाशिक

सिन्नर : तालुक्यात आज ५८ करोना बाधितांची भर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सिन्नर | Sinnar | प्रतिनिधी

तालुक्यात आज 58 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील 33 तर ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. शिवाजीनगर मध्ये आठ रुग्ण आढळले असून त्यात 50, 24, 20, 42, 54 वर्षीय महिला 65, 28, 51 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. गंगावेस भागात चार रुग्ण आढळून आले असून त्यात 35, 34, 24 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.

खडकपुरा परिसरात चार रुग्ण आढळले असून त्यात 50, 45 व 21 वर्षीय पुरुष तर 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जाखडी गल्लीत 54 वर्षीय पुरुष, कानडी मळ्यात साडेचार वर्षांची बालिका 23 वर्षीय महिला करुणा बाधित निघाली आहे. विजय नगरमध्ये 60 व 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रेणुका नगर मध्ये 56 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एसटी कॉलनी पन्नास वर्षीय पुरुष, आश्वीनाथनगर मध्ये साडे चार वर्षाचे बालक व 31 वर्षीय पुरुष, गणेश नगर मध्ये 29 वर्षीय पुरुष व 41 वर्षीय महिला यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे.

याशिवाय सिन्नर शहरात 75, 29 वर्षीय पुरुष व 70, 31 व 22 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे. ग्रामीण भागात 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मनेगाव मध्ये सहा रुग्ण आढळले असून त्यात 55, 16 व 15 वर्षीय पुरुष तर त्यात 35 वर्षीय महिला 18 व 13 वर्ष मुलींचा समावेश आहे.

नांदुर-शिंगोटे येथे पाच रुग्ण आढळले असून त्यात 58, 28, 40 वर्षीय महिला व 4 वर्षीय मुलीचा समावेश आहे. याच गावातील 20 वर्षीय तरुणही बाधित निघाला आहे. पांडूर्ली येथील 30 वर्षीय महिलेसह 4 व 5 वर्षीय मुलींचा समावेश आहे.

विंचूर दळवी येथे 27 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलगी, शहा येथे 23 वर्षीय महिला व 2 वर्षीय मुलगा, निरहाळे येथे 22 वर्षीय महिला व 7 वर्षीय मुलगी, डुबेरे येथे 26 वर्षीय पुरुष, ठाणगाव 52 वर्षीय पुरुष, बारागाव पिंपरी 47 वर्षीय पुरुष, वडझिरे येथे 35 वर्षीय पुरुष, कनकोरी येथे 20 वर्षीय युवक बाधित निघाले आहेत.

सकाळी सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात मानोरी येथील तीन व जामगाव येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आज दिवसभरात त्यात 64 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या 402 झाली आहे. त्याशिवाय 32 संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com