न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेद्वारे 'इतकी' प्रकरणे निकाली

नाशिक | प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक समितीमार्फत १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करून ५७१ प्रकरणांवर वैध निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

विशेष त्रुटी पुर्तता मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पूर्तते अभावी अर्जदारांकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समिती मार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर CCVIS - II प्रणालीद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत.

त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केली नसल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे उपस्थित रहावे.

ज्या अर्जदारांकडून वर नमूद कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही उपायुक्त तथा सदस्य नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे. तसेच कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये व त्रयस्थ व्यक्तिच्या आमिषास बळी पडू नये, असे आवाहन ही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com