चांदवड तालुक्यातील भूत्यानेत बालिकेचा विनयभंग; ५५ वर्षीय संशयितास बेड्या

चांदवड तालुक्यातील भूत्यानेत बालिकेचा विनयभंग; ५५ वर्षीय संशयितास बेड्या

दिंडोरी | प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील भुताने येथे दहा वर्षीय मुलीचा 55 वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे....

चांदवड तालुक्यातील भुत्याने येथील 10 वर्षीय मुलगी कटलरी साहित्य घेण्यासाठी गेली होती. दुकानातील शरद रामभाऊ कुंभार्डे याने तिला जवळ बोलावले व तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी मुलीने घरी माहिती दिल्यानंतर तिच्या आईने वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयितास पोलीसानी अटक केली आहे. अधिक तपास मनमाड चे उपविभागीय अधिकारी समीर साळवे करीत आहे. यापूर्वीही याचं संशयितावर बलात्कारचा गुन्हा दाखल असल्याचे समजते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com