नाशिक मनपा
नाशिक मनपा
नाशिक

नाशिक मनपासाठी आयएमएकडुन ५५ फिजीशियन

१५ डॉक्टर आठवड्यात गंभीर रुग्णावर करणार उपचार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा वाढता संसर्गामुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढत असतांना महापालिकेकडे बोटावर मोजण्या इतक्याच फिजीशियन डॉक्टरांकडुन करोनाच्या गंभीर रुग्णांकडुन उपचार सुरू होते. या पार्श्वभूमीवर आयएमए महापालिकेच्या मदतीला धावली आहे. आता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आयएमएकडुन 55 फिजीशियन उपलब्ध करुन देण्यात आले असुन आंठवडाभर 15 डॉक्टर्स असे महिनाभरात शिफ्टनुसार हे डॉक्टर्स गंभीर रुग्णांवर उपचार करणार आहे.

नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकिय आस्थापनेवर फिजिशियनची संख्या अल्प असुन अगोदर असलेल्या डॉक्टरांनी राजीनामे दिलेले आहे. या पार्श्वभूमी एप्रिलपासुन शहरात करोनाचा शिरकाव घातल्यानंतर आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नाशिकला करोनाचा विळखा बसला आहे. रुग्णांचा आकडा 13 हजारावर आणि मृताचा आकडा 337 पर्यत गेला आहे. यात पन्नास - साठ वर्षावरील रुग्णांचा मृत्यु मोठ्या प्रमाणात झालेले आहे.

रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यासारखे आजार असलेल्या करोना रुग्णांना आयसीयु, ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडवर ठेवून उपचार केले जात असतांना मागील काही महिन्यात याठिकाणी काम करणार्‍या फिजीशियनची कमतरता होती. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या भरतीत 10 फिजीशियनच्या जागा असतांना केवळ 1 -2 डॉक्टरच भरतीसाठी पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार शहरातील डॉक्टरांची मदत घेण्यासंदर्भात सुचना मिळाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जुन महिन्यातच अत्यावश्यक बाब म्हणुन खाजगी डॉक्टराची मदत घेण्याचे संकेत दिले होते.

याच पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी डॉक्टरांची मदत घेतल्यानंतर नुकतीच महापालिकेसोबत आयएमए सोबत बैठक झाली. यात 55 फिजीशियन कोविडच्या गंभीर रुग्णांवर आणि कोविड रुग्णांलयात उपचार करण्यासाठी पुरविण्याचे नियोजन आयएमएकडुन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दर आठवड्याला 15 फिजीशियन महापालिकेला मोफत सेवा पुरविणार असुन 55 फिजीशियन महिनाभरात टप्प्या टप्प्याने कोविड रुग्णालयात रुग्णसेवा देणार आहे. यामुळे आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हणुन शहरात मेस्मा लागु झाला नाही...

नाशिक महापालिका क्षेत्रात जुनपासुन मोठा करोना संसर्ग सुरु झाल्यानंतर आता नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. याकरिता लागणारे डॉक्टर्स याची भरती प्रक्रिया झाली असुन 50 टक्के उमेदवार आले होते. वाढते रुग्ण व मृतांचा आकडा लक्षात घेऊन खाजगी डॉक्टर्स पुढे आले आहे. आयएमएच्या पुढाकाराने फिजीशियन मिळाले असुन ते कार्यरत झाले आहे. यामुळे शहरात वैद्यकिय सेवेसाठी मेस्मा लागु झालेला नाही.

- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकिय अधिकारी मनपा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com