अल्पायुष्यात २१ कथासंग्रह, ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहणारे 'आण्णाभाऊ'

साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन
अल्पायुष्यात २१ कथासंग्रह, ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहणारे 'आण्णाभाऊ'

नाशिक | Nashik

आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या, वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांचा आज स्मृतिदिन. (Death Anniversary)

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर (Shahir) म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले.

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील (Marathi literature) लोकवाङमय, कथा (Stories), नाट्य, लोकनाट्य (Loknatya), कादंबऱ्या (Novels), चित्रपट (Pictures), पोवाडे, लावण्या (Lavni), वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

तमाशा (Tamasha) या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ (United Maharashtra Movement) , गोवा मुक्ती संग्राम (Goa Mukti Sangram) या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा`(Lal Bawta) पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.

१६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क (Shiwaji Park) वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले.

‘फकिरा’ (Fakira) या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर (V S Khandekar) यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याn(Dr. B R Ambedakar) झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.

‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.

कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com