आयएमए व सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखात बळ !

पेठ अभ्यासिकेस ५१ हजाराची पुस्तके भेट
पेठ
पेठ

पेठ | Peth

शहरांपासून कोसो दूर वाडी वस्तीवर प्रतिकूल भौतिक सुविधांशी सामना करत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या या गरूड भरारीला नाशिकच्या इंडियन मेडीकल असोसीयशन ( आयएमए ) ने पंखात बळ दिले आहे. त्यांनी सोशल नेटवर्कींग फोरमच्या पेठ येथील हुतात्मा स्मारक अभ्यासिकेस ५१ हजार रूपयाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके भेट दिली.

फोरमने नगरपंचायतीच्या सहकार्यातून पेठ येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक परिसरात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरू केली आहे. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतांनाही केवळ कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शहरात जाऊन अभ्यास करणे शक्य नसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पेठ येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

९ ऑगस्ट क्रांतीदिन व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, सोशल नेटवर्कींग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या प्रयत्नातून विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी ५१ हजार रूपयाची पुस्तके भेट देण्यात आली.

याप्रसंगी आयएमएचे सचिव डॉ. सुदर्शन आहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com