महिलेच्या गळ्यातून ५० हजाराचे मंगळसूत्र ओरबाडले

महिलेच्या गळ्यातून ५० हजाराचे मंगळसूत्र ओरबाडले

इंदिरानगर | Indiranagar

येथील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबडून नेल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि२४) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास वाजेच्या जया सातपुते (५८ लक्ष्मी कृपा बंगला उद्यान कॉलनी इंदिरानगर ) या मेडिकल मध्ये क्रीम घेण्यासाठी गजानन महाराज मंदिरालगतच्या रस्त्यावरून स्टेट स्टेट बँक कॉलनी समोरून पायी जात असताना समोरून आलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमाने पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या चेन मधील मंगळसूत्र सुमारे ५० हजार रुपये किमतीचे बळजबरीने ओरबाडून पळून गेले.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पो नी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राकेश भामरे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com