देवळालीत विनापरवाना धार्मिक कार्यक्रम; कॅन्टोमेन्टकडून 50 हजाराचा दंड

देवळालीत विनापरवाना धार्मिक कार्यक्रम; कॅन्टोमेन्टकडून 50 हजाराचा दंड

दे.कॅम्प। वार्ताहर

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेले आदेश डावलून येथील लमरोड भागातील कलापूर्णम तीर्थ धाम या जैन मंदिरात विनापरवाना धार्मिक कार्यक्रम आयोजित करून 200 पेक्षा अधिक लोक जमा केल्याने कॅन्टोमेन्ट प्रशासनाने या मंदिर ट्रस्टला 50 हजाराचा दंड करीत मालमत्ता सील केली आहे...

करोना काळात कुठल्याही कार्यक्रमांना परवानगी नसतांना देवळाली कॅम्पच्या लमरोड भागातील बालगृहरोड वरील कलापूर्णम तीर्थ धाम या जैन समाजाच्या धार्मिकस्थळी दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याबाबत त्यांनी कॅन्टोमेन्ट प्रशासन यांची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती.

परिसरात अचानक गर्दी झाल्याने शिवसेनेचे उपशहर प्रमुख वैभव पाळदे यांनी सोसिएल मीडियाच्या माध्यमातून कॅन्टोमेन्ट प्रशासन याना माहिती दिली असता,मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी स्वतः या ठिकाणी भेट दिली, त्यावेळी 200 पेक्षा अधिक लोक धार्मिक कार्यक्रम प्रसंगी एकत्र आल्याचे दिसून आले.

कोविड 19 च्या नियमाचे येथे सारासार उल्लंघन होत असल्याने,तसेच घटना व्यवस्थापक म्हणून कॅन्टोमेन्टने काढलेल्या आदेशाचा भग होत असल्याने लालजी करसन करीया,ट्रस्टी, कलापूर्णम तीर्थ याना नोटिस बजावून बजावून 50 हजाराचा दंड ठोठावला तसेच संपूर्ण मालमत्ता सील करण्यात आली.

मात्र या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी देखील कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र तसे घडले नाही.राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश असतांना येथील भगवान पार्श्वनाथ मंदिर खुले कसे व या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात कसे हा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गुन्हे दाखल होणे अपेक्षित

करोना काळात सर्व काही शासकिय नियमानुसार सुरू आहे,याठिकाणी नियमाचे उलघन केले मंहून फक्त 50 हजाराचा दंड केला,त्याच प्रमाणे आयोजकांवर नियमानुसार गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे

-वैभव पाळदे, उपशहर प्रमुख, शिवसेना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com