कळवण उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड सुरु

कळवण उपजिल्हा रुग्णालय
कळवण उपजिल्हा रुग्णालय

कळवण । Kalwan

कळवण उपजिल्हा रुग्णालयातील 50 ऑक्सीजन बेड तसेच नादुरस्त असलेले 14 व्हँटिंलेटर सुरु करण्यात आले आहे. छावा क्रांतीविर सेनेच्या मागणीला यश आले आहे. मागील आठवडयात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने प्रांतधिकारी विकास मिना यांना निवेदन देण्यात आले होते.

कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नवीन 50 बेडचे कोविड मेंद्र सुरु कऱण्यात आले आहे. या 50 पैकी फक्त 14 ऑक्सीजन बेड सुरु होते. तर 36 बेड ऑक्सिजन गळतीमुळे बंद होते. आता सर्व 50 ऑक्सीजन बेड सुरू झाले आहे. नादुरस्त असलेले 14 व्हॅटीलेंटर सुद्धा सुरू झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

छावा क्रांतीविर सेनेने वेळोवेळी ऑक्सीजन बेड तसेच व्हॅटीलेंटर सुरु करावे या संदर्भात प्रशासनाकडे मागणी केली होती. प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत मागील आठवड्यात 50 ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन सर्व सामांन्याना दिलासा दिला.

पंरतू 50 ऑक्सीजन बेड पैकी फक्त 14 बेड सुरू करण्यात आल्याने उर्वरीत 36 ऑक्सीजन बेड निकामी असल्याने छावा क्रांतीविर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप पगार यांनी प्रांतधिकारी विकास मिना यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षात आणून दिली होती. छावा संघटनेच्या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन उर्वरीत 36 बेड तसेच 14 व्हॅटीलेटर तत्काळ सुरू केल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या मागणीला यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासुन कळवण शहर व तालुक्यात करोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असतांना त्या पार्श्वभुमीवर छावा सेनेने ऑक्सिजन बेडसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत उपजिल्हा रुग्णालयात 50 ऑक्सीजन बेड सुरु केले होते. पंरतू आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे फक्त 14 ऑक्सीजन बेड सुरू होते. उर्वरीत 36 बेड निकामी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर होता.

छावा क्रांतीविर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी पाठपुरावा केल्याने उर्वरीत 36 बेड तसेच नादुरुस्त असलेले 14 व्हॅटींलेटर सुरु करुन आरोग्य सुविधा सुरळीत करण्यात आल्याने तालुक्यासह शहरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com