तीर्थक्षेत्र कावनईसाठी ५० लाखांचा निधी

सभापती सुशीला मेंगाळ यांच्याकडून मदत
तीर्थक्षेत्र कावनईसाठी ५० लाखांचा निधी
प्रतिनिधिक फोटो

घोटी | Ghoti

कावनई येथे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद सभापती सुशीला मेंगाळ यांच्या निधीतून ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे.

धार्मिक स्थळ तथा कुंभमेळ्याच्या स्थान असलेल्या तिर्थ क्षेत्र कावनई येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील विकास कामे ठप्प होती.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे विकासकामांच्या समस्यां होत्या त्यामुळे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद सभापती सुशीला मेंगाळ यांनी ५० लाखाचा निधी दिला आहे.

दरम्यान तालुक्यातील कुशेगाव येथे किष्किंधा नगरीसाठी दहा लाख रुपये निधी दिला असल्याची माहिती सभापती सुशीला मेंगाळ यांनी दिली आहे. प्रभू रामचंद्र व सुग्रीव यांची या ठिकाणी भेट झाल्याची आख्यायिका आहे.

कुशेगाव येथील किष्किंधा नगरीत लोकवर्गणीतून भव्य दिव्य मंदिराचे काम सुरू असून आज सभापती मेंगाळ यांच्या निधीतून १० लक्ष मिळाल्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com