इगतपुरी तालुक्यात ५० किलो गांजा जप्त

इगतपुरी तालुक्यात ५० किलो गांजा जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घोडेवाडी शिवारात शेतावरील बांधावर लागवड केलेल्या गांजाची झाडे घोटी पोलिसांनी जप्त केली आहे. या झाडांचे वजन अंदाजे पन्नास किलो असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...

सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील घोडेवाडी शेत शिवारात गांजा असल्याची माहिती घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पोलिसांना मिळाली.

इगतपुरी तालुक्यात ५० किलो गांजा जप्त
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

घोटी पोलिसांनी माहितीची खात्री घोडेवाडी शिवारातील शेतकरी चिमा घोडे यांच्या शेतावर छापा टाकत धडक कारवाई केली. यात पन्नास किलो गांजा जप्त केला. शेतकरी चिमाजी घोडे (५०) यांस घोटी पोलिसांनी अटक करून पंचनाम्यासह गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com