गिरणारे येथे ५० बेडचे क्वारंटाईन सेंटर

गिरणारे येथे ५० बेडचे क्वारंटाईन सेंटर

गिरणारे ग्रामस्थांचा पुढाकार

नाशिक | Nashik

गिरणारे येथे केबीएच हायस्कुल मध्ये क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर या क्वारंटाईन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. गिरणारे व परीसरातील ज्या नागरीकांना होम क्वारंटाईन होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसेल त्यांनी या क्वारंटाईन सेंटरमध्ये येऊन सुविधा घ्यावी असे आवाहन तानाजी गायकर यांनी केले आहे.

या ठिकाणी 24 तास डाॅक्टर उपलब्ध असणार असून त्या सोबत जेवण, पिण्याचे पाणी, गरम पाणी व पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

यासाठी शरद थेटे, अविनाश पाटिल, मनोज थेटे, मनोज बाविस्कर, राम वाकचौरे, दत्तु ढगे, रमेश अय्यर तसेच सर्व डॉक्टर्स, केबीएच हायस्कुल व गिरणारे ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com