नाशिकमध्ये इतक्या करोना रुग्णांना डिस्चार्ज

२ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिकमध्ये इतक्या  करोना रुग्णांना डिस्चार्ज
करोनामुक्त

नाशिक । Nashik

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५ हजार ७२३ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १२९, चांदवड १२, सिन्नर १०५, दिंडोरी ५४, निफाड ११३, देवळा ०३, नांदगांव ६५, येवला ५२, त्र्यंबकेश्वर २५, सुरगाणा ०८, पेठ ११, कळवण ११, बागलाण १७, इगतपुरी ८०, मालेगांव ग्रामीण ४५ असे एकूण ७३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४७ तर जिल्ह्याबाहेरील ५८ असे एकूण २ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७३९ रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८२ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १९४ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८० व जिल्हा बाहेरील १५ अशा एकूण ३७१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️८ हजार ७३९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५ हजार ७२३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ६४५ पॉझिटिव्ह रुग्ण.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Related Stories

No stories found.