इगतपुरीत उद्यापासून ५ दिवस जनता कर्फ्यु

इगतपुरी नगरपरिषद येथे बैठक; व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय
इगतपुरीत उद्यापासून ५ दिवस जनता कर्फ्यु

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असून तालुक्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या तीनशेच्या वर गेली आहे. याच अनुषंगाने इगतपुरी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी निर्मला गायकवाड/पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक झाली.

या बैठकीत तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांचा उपस्थितीत व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर ५ दिवसीय जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत हॉस्पिटल व मेडिकल सुविधा व्यतिरिक्त संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याकारणाने शहरातील गर्दी कमी होत असतांना दिसत नसल्याने तातडीने बैठक आयोजित केली होती. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नगरपरिषद हद्दीतील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने ( मेडीकल व दवाखाने वगळुन), व्यापारी आस्थापना ह्या दि. २० एप्रिल पासुन ते २५ एप्रिल पर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

फक्त दुध विक्रत्यांना दुध विक्रीसाठी सकाळी ६ ते ८ व सध्यांकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा असणार आहे. बंद काळात सुचनांचे पालन न केल्यास इगतपुरी नगरपरिषद व पोलीस प्रशासनामार्फत कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी दिली.

करोना संसर्गा काळात कोरोना विषाणुला हद्दपार करण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडु नका. आपली स्वताची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

-- निर्मला गायकवाड/पेखळे, मुख्याधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com