नाशिक जिल्ह्यातील 'या' क्रीडा संकुलासाठी विधानसभेत ५ कोटी मंजूर

नाशिक जिल्ह्यातील 'या' क्रीडा संकुलासाठी विधानसभेत ५ कोटी मंजूर

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील सय्यद पिंपरी येथील प्रस्तावित क्रीडासंकुलासाठी (Sports Complex) 15 कोटींच्या कामाला मंजुरी दिलेली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपयांचा निधी (Fund) विधानसभेत (Assembly) मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी दिली…

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सय्यद पिंप्री येथील क्रिडा संकुलच्या प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या विकास कामासाठी ५ कोटी निधी मंजूर करीत आ. सरोज आहिरे यांच्या प्रयत्नांना भक्कम साथ दिली आहे.

आ आहिरे यांच्या मागणीनुसार सय्यद पिंपरी येथील क्रीडा संकुलसाठी हिवाळी अधिवेशनात त्वरीत निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी केली असता, पुरवणी मागणीमध्ये 15 कोटी पैकी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील क्रीडा खेळाडू व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या क्रीडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. हे जिल्ह्यातील अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे तालुक्यातील विकासात भर पडणार आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 कोटी रूपये क्रीडा संकुलाच्या विकास कामाकरिता मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कामाला निधी उपलब्ध करून झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com