जिल्ह्यात 24 तासात 487 रूग्ण करोनामुक्त

करोना मुक्तांचा आकडा 89 हजार वर
जिल्ह्यात 24 तासात 487 रूग्ण करोनामुक्त

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने घटत आहे. मागील चोवीस तासात केवळ 232 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा दुप्पट 487 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

यामुळे करोनावर मात करणारांचा आकडा 89 हजारवर पोहचला आहे. हे प्रमाण 94.44 टक्के इतके आहे.

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटत चालली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात केवळ 232 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 153 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 62 हजार 283 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 71 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 26 हजार 987 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य दोन आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 158 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 719 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 487 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 88 हजार 911 झाला आहे.

करोनामृत्यूमध्येही मोठी घट झाली असून आज दिवसभरात 2 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन्ही रूग्ण ग्रामिण भागातील आहेत. आज सलग दुसर्‍या दिवशी नाशिक शहरात एकही मृत्यू नाही. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 672 झाली आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. दिवसभरात 559 नवे संशयित दाखल झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com