नाशिकमधील ४१०प्रतिबंधीत क्षेत्रात ४ हजार ७८६ अति जोखमीच्या व्यक्ती

१० हॉटस्पॉटमध्ये २४० रुग्ण ; यातून बहुतांशी मृत्यु व संक्रमण
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मुबई, ठाणे, पुणे, जळगांव, यासह इतर भागातून येणार्‍या व्यक्तीं नाशिक शहरात करोना वाहक ठरल्याचे आत्तापर्यत वैद्यकिय विभागाकडुन घेण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.

प्रवासानंतर नाशिक शहरात दाखल झालेल्या व्यक्तींमुळे करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढले असुन शहरात आत्तापर्यत 410 प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आल्यानंतर यापैकी 108 ठिकाणचे प्रतिबंध रद्द करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात 4 हजार 786 अतिजोखमीच्या व्यक्ती आढळून आल्यानंतर यातूनच शहराचा आकडा 2040 इतका झाला असुन 104 जणांचा मृत्यु झाला आहे.

करोनाग्रस्त देश व देशातील इतर भागातून नाशिक शहरात दाखल झालेल्या नागरिकांचा आकडा 9347 इतका झाला आहे. नोकरी, शिक्षण, अत्यंसंस्काराच्या निमित्ताने, नातेवाईकांची भेट, धार्मिक स्थळांना भेटी, सहली यासाठी गेलेली मंडळी शहरात दाखल झाली आहे. त्यानंतर प्रवासाच्या निमित्ताने आणि उपचारसाठी शहरात अनेक जण दाखल झाले आहे.

अशा प्रकारे शहरात दाखल झालेल्या नागरिकांतून शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. गेल्या 31 मे रोजी करोनाग्रस्तांची संख्या 234 असतांना शहरात या बाधीत रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या सुमारे 1400 आणि कमी जोखमीच्या व्यक्ती सुमारे 2100 इतक्या होत्या.

याच अतिजोखमीच्या व्यक्तींच पुढे त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बाधीत झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन महिन्यात करोना प्रादुर्भाव इतक्या झपाट्याने वाढला कि एका महिन्यात रुग्णांचा आकडा 2040 पर्यत जाऊन पोहचला आहे. आता आजपर्यत महापालिका क्षेत्रात अतिजोखमीच्या व्यक्ती 4 हजार 786 इतक्या आणि कमी जोखमीच्या व्यक्ती 7 हजार 55 इतक्या असल्याची नोंद झाली आहे. बाधीतांच्या संपर्कातील आलेले कुटुंब, नातेवाईक, मित्र मंडळी व इतर यांना मोठ्या प्रमाणात बाधा झाल्याचे जुने नाशिक व पंचवटी भागातून दिसुन आले आहे.

शहरात हॉटस्पॉट असलेल्या दहा भागात आजपर्यत सर्वाधिक रुग्ण आढळून आले असुन या बाधीतांकडुन नवीन करोना रुग्णांत भर घालण्याचे काम सुरू असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या दहा हॉटस्पॉट मधुन जवळपास 240 करोना बाधीत आढळले असुन असुन त्यांच्याकडुन करोना संक्रमणाचे काम सुरू आहे.

या भागात प्रतिबंधीत क्षेत्र असतांना देखील याची कोणतीही पर्वा केली जात नसल्याने करोना रुग्णांत भर पडत आहे. एकुणच शहरात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग होत असतांना नागरिकांत बेफिकीरी दिसुन येत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनी आपण बाधीतांच्या संपर्कात येऊन अति जोखमी किंवा कमी जोखमीच्या व्यक्तीच्या यादीत तर येणार नाही ना ? यांची दक्षता घेणे आवश्यक आहे.

नाशिक शहरात 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपुर्ण एप्रिल महिन्यात केवळ 5 ते 6 प्रतिबंधीत क्षेत्र शहरात जाहीर झाले होते. यानंतर आत्ता हा आकडा वाढत जाऊन 410 झाला आहे. या संपुर्ण क्षेत्रातून 108 प्रतिबंधीत क्षेत्र रद्द झाले असले तरी याठिकाणी सध्या महापालिकेच्या वैद्यकिय विभागाची 356 पथके कार्यत आहे. त्यांच्याकडुन दररोज आरोग्य सर्व्हे सुरू आहे. सध्या 10 हजार 828 घरांच्या सर्व्हेतून 42 हजार 759 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून 3344 जणांना रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर यापैकी 1002 जण करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com